शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

२२९ गावांना पाणी टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:53 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून ३९१ उपाययोजनांवर ६ कोटी २ लाख रुपयांचा खर्च

आॅनलाईन लोकमतवर्धा : उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात. परंतु यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या जात नाही. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. या गावांतील नागरिकांना दिलासा देण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६ कोटी २ लाख रुपयांचा आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.गत उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई असलेली गावे कमी असल्याचे मंजुर आराखड्यावरून दिसत आहे. गत उन्हाळ्यात २८६ गावात पाणीटंचाई जाणवल्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. या गावातील पाणी टंचाई निवारण्याकरिता ४७८ उपाययोजनांवर ७ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ऐवढी रक्कम खर्च होवूनही यंदा २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणाºया गावात ३९१ उपाययोजना आखण्यात आल्या आहे.करण्यात येणाºया उपाययोजनापाणी टंचाई निवारण्याकरिता टंचाईग्रस्त गावात ४६ विहिरीचे खोलीकरण तर १२९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. १२४ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात येणार असून तात्पूरती पुरक योजना म्हणून एक योजना मंजूर करण्यात आली आहे. सध्या टंचाई असलेल्या गावात सात उपाययोजनांची दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. या उपाययोजना तीन महिन्याकरिता असल्याचे सांगण्यात आले आहे.१५ जलाशयात ४१.३८ टक्के जलसाठावर्धा जिल्ह्यात मोठे आणि मध्यम असे मिळून १५ जलाशय आहेत. या जलाशयातून शेतीच्या सिंचनासह व्यवसाय, उद्योग व नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. सध्या या जलाशयात पाण्याची स्थिती ठिकठाक असली तरी उन्हाळ्याच्या दिवसात झपाट्याने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या जलाशयात ४१.३८ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.अत्यल्प पावसामुळे स्थिती बिकटजिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे जलसाठे पूर्णत: भरले नाही. परिणामी हिवाळ्याच्या अखेरीसच पाण्याची पातळी निम्यापेक्षा कमी आहे. यातच यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य आग ओकणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या जलसाठ्यात पाणी राहील अथवा नाही याबाबत साशंकता आहे.