शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

२,१७३ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:34 IST

तूर खरेदीवरील बंदी उठली असून ती सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्ह्यात मंगळवारपासून तूर खरेदी झाली आहे. या खरेदीमुळे आॅनलाईन नोंद करून बोलावणे येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील तब्बल २,७७३ शेतकºयांच्या तूर खरेदीचा मार्ग मोकळा झाला.

ठळक मुद्देबंदी उठली; खरेदीचे पत्र धडकले : जिल्ह्यातील सात केंद्रांवरून आतापर्यंत ६४,३३६ क्विंटल तूर खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तूर खरेदीवरील बंदी उठली असून ती सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्ह्यात मंगळवारपासून तूर खरेदी झाली आहे. या खरेदीमुळे आॅनलाईन नोंद करून बोलावणे येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील तब्बल २,७७३ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा मार्ग मोकळा झाला.वर्धा जिल्ह्यात नाफेडच्या सात आणि विदर्भ मार्केटींगच्या खरेदी केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे. येत असलेल्या अडचणींवर मार्ग काढून शासनाच्यावतीने सुरू असलेली तूर खरेदी गोदामाचे कारण काढून १८ एप्रिल पासून बंद करण्यात आली. यामुळे या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीवर संकट निर्माण झाले होते. परिणामी, अनेकांकडून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यावी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी खरेदीला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार खरेदीचे पत्र पणन महामंडळाला सोमवारी रात्री प्राप्त झाले. या पत्रानुसार जिल्ह्यातील सातही केंद्रांवर आजपासून पुन्हा खरेदी सुरू झाली आहे.या खरेदीपूर्वी शासनाच्यावतीने जिल्ह्यात ५ हजार ६२७ शेतकऱ्यांकडून ६४ हजार ३३६ क्ंिवटल तूर खरेदी झाली. उर्वरीत शेतकºयांकडून तूर खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी येत्या १५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या दिवसात उर्वरीत शेतकºयांची तूर खरेदी करण्याचे आव्हान या खरेदी यंत्रणेला पेलावे लागणार आहे.जिल्ह्यात ७,८०० शेतकरी झाले आॅनलाईनशासनाने शेतमालाची खरेदी आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तुरीलाही लागू होत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनाची आॅनलाईन नोंदणी केली. जिल्ह्यात तब्बल ७ हजार ८०० शेतकरी आॅनलाईन झाले. यापैकी ५ हजार ६२७ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी झाली तर उर्वरीत शेतकऱ्यांकडून अद्यापही तूर खरेदी होणे बाकी आहे.१,२७३ क्ंिवटल चण्याची खरेदीजिल्ह्यात तुरी सोबतच चणा खरेदीही सुरू आहे. नाफेडच्या सात पैकी तीन केंद्रांवरून चणा खरेदी सुरू आहे. आतापर्यंत या तीन केंद्रांवरून ८७ शेतकऱ्यांकडून १ हजार २७३ क्विंटल चण्याची खरेदी झाली आहे. तुरी प्रमाणे चणा खरेदीही आॅनलाईन झाल्याने तीन केंद्रांवरून आतापर्यंत ७३१ शेतकरी आॅनलाईन झाले आहे. या व्यतिरिक्त इतर केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. इतर केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे पणन महामंडळाने सांगितले.