शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२.१६ लाख शेतकरी आरक्षणाच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:33 IST

शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देकेवळ सहा जणांची असंमती : शैलेश अग्रवाल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले. त्यावर आतापर्यंत काही लोकप्रतिनिधींसह एकूण २ लाख १६ हजार ३१४ नागरिकांनी शेतकरी आरक्षणासंदर्भात संमती दर्शविली आहे. तर केवळ सहा जणांनी असंमती दर्शविली आहे, अशी माहिती शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी दिली आहे.आपण देशापूढे शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढ्याच आत्मीयतेने मांडलेल्या शेतकरी आरक्षणाच्या विषयाला ठिकठिकाणी शेतकºयांनी स्वीकारले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी व असंख्य ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत शेतकºयांच्या आरक्षणाचा ठराव घेतला असून सरकार मधील मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी सर्वप्रथम या विषयाला आपले समर्थन दर्शविले होते. हा लढा सर्वत्र जोर धरत असतांना खुद्द देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकºयाना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही याविषयी आपण भेट घेऊन माहिती दिली. सर्वच पक्षातील नेत्यांनी शेतकरी हितार्थ या मुद्यावर एकत्रित येण्याची गरज असल्याची भावना असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.सेवाग्राम येथून सुरुझालेला शेतकरी आरक्षणाचा लढा महाराष्ट्रासह देशाच्या उत्तरेतील हरियाणापर्यंत जाऊन पोहचला आहे. हरियाणातील एका गावामध्ये गावकºयांनी ग्रामसभा घेऊन शेतकºयांना आरक्षण मिळाले पाहिजे असा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. आरक्षण हा विषय देशाला नवीन नाही; पण आजवर जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले असून शेतकरी आरक्षण या विषयी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हित लक्षात घेऊन तात्काळ योग्य निर्णय द्यावा, अशी मागणीही शैलेश अग्रवाल यांची आहे.