शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

८३ लाखांचा दारूसाठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 21:49 IST

खात्रीदायक माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कारंजा (घा.) येथील टाल नाक्याजवळ नाकेबंदी करून ट्रेलरसह ८३ लाखांचा दारूसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा नजीकच्या टोल नाक्यावर नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। एकाला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खात्रीदायक माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कारंजा (घा.) येथील टाल नाक्याजवळ नाकेबंदी करून ट्रेलरसह ८३ लाखांचा दारूसाठा जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा नजीकच्या टोल नाक्यावर नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. यावेळी आर. जे. १९ जी. ए. ८५३२ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला.ट्रक चालकाला दारूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विचारणा केली असता ते त्याच्याकडे नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारूसाठ्यासह दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रेलर जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक सुभाष बोडके यांच्या निर्देशानुसार मोहन पाटील, दिलीप वल्के, मिलींद लांबाडे, हरिदास सुरजुस, बंडू घाटुर्ले यांनी केली. हा दारूसाठा कुठे नेल्या जात होता याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभाग घेत आहे.भुशात लपविल्या होत्या दारूच्या पेट्याराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ट्रेलरची बारकाईने पाहणी केली असता ट्रेलरमधील भुशात दारूच्या पेट्या लपवून त्या दारूची अवैध पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रेलरसह एकूण ८३ लाख ९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३, १०८ नुसार कारवाई केली आहे.कारसह दारूसाठा जप्तसमुद्रपूर - आरंभा टोल नाक्याजवळ पोलिसांनी नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. याच दरम्यान पोलिसांनी एम.एच. ३२ ए. एम. ५२७० क्रमांकाच्या कारची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारमधील इंद्रजित भुपेंद्रसिंग भाटीया (३६) व अमरजित हरमेंद्रसिंग भाटीया (५०) दोन्ही रा. चंद्रपूर यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस