शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांनी लढाई जिंकली; पण नोकरी मिळेना

By admin | Updated: June 10, 2017 01:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह हिंगणघाट येथे कार्यरत दोन महिलांना १९९८ मध्ये पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले.

उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट : समाजकल्याण विभागाचीही टाळाटाळ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह हिंगणघाट येथे कार्यरत दोन महिलांना १९९८ मध्ये पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. याविरूद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नोकरीत घेण्याचा निर्वाळा दिला. यावर शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. यातही अपिल खारीज करून महिलांच्या बाजूने निकाल देण्यात आला. तब्बल १९ वर्षांनी महिलांनी लढाई जिंकली; पण अद्याप त्यांना नोकरीवर रूजू करून घेण्यात आले नाही. हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे विमल हिरामण खंडारे व छबू चंपत कसाळ दोन्ही रा. पुलफैल, वर्धा या मदतनीस, स्वयंपाकी म्हणून कार्यरत होत्या. १९८९ व १९९३ पासून त्या वसतिगृहामध्ये कर्तव्यावर होत्या. त्यांना कुठलेही कारण न देता वा पूर्वसूचना न देता १९९८ मध्ये अचानक कामावरून कमी करण्यात आले. या अन्यायाविरूद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ एप्रिल २००७ रोजी महिलांच्या बाजूने निकाल दिला. यात दोन्ही महिलांना स्वयंपाकी म्हणून कामावर रूजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले. यावर शासनाने सर्वाेच्च न्यायालयात अपिल दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने ७ जून २०१६ रोजी शासनाचे अपिल खारीज करीत उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत जागा रिक्त असल्यास त्वरित कामावर घेण्याचे आदेश दिले. यावरून आरटीआय अंतर्गत माहिती घेतली असता जिल्ह्यात वर्धा, पुलगाव, आर्वी व हिंगणघाट येथील वसतिगृहांमध्ये जागा रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे पुर्ववत कामावर रूजू करून घ्यावे, अशी मागणी विमल खंडारे व छबू कसाळ यांनी केली आहे. याबाबत समाजकल्याण विभागाला निवेदनेही दिलीत; पण वर्ष लोटले असताना कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. जागा रिक्त असताना रूजू करून घेतले जात नसल्याने दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना दारिद्र्यात जगावे लागत आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान विमल खंडारे व छबू कसाळ या दोन्ही महिलांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. समाज कल्याण विभागाला त्यांना कामावर घेण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयानेही जागा रिक्त असल्यास कामावर रूजू करून घेण्याचे आदेश दिले; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाच्या गृहपालांनी त्यांना रूजू करून घेतले नाही. यातून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जात असल्याचेच दिसते. वसतीगृहात विद्यार्थी आल्याशिवाय आपली हजेरी नोंदविणे सुरू होणार नाही. असे वसतिगृहाच्या प्रमुखांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही आपल्याला मानसिक त्रास दिल्या जात असल्याचे दोनही महिलांनी लोकमत कार्यालयात येवून सांगितले.