शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला १८ हजार मेट्रिक टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

ठळक मुद्देवाहतुकीला सुरुवात : तीन महिन्यांच्या नियतनाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे गोरगरिबांना तीन महिन्यांचे धान्य नियतन एकाच वेळी मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मागणी केली होती. जिल्ह्याला तीन महिन्यांसाठी जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य नियतन मंजूर झाले आहेत. येत्या एक एप्रिलपासून संबंधीत दुकानदारांना तीन महिन्यांचे नियतन धान्य देण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. जिल्ह्याला तीन महिन्यांचे नियोजन एकाच वेळी मंजूर करण्यात आले आहे. शासनाकडून पुरवठाही सुरू झाला आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीसाठी अधिक वाहने लावून दुकानापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था पुरवठा विभागामार्फत करण्यात आली आहे.दररोजचे नियतन ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. यात बहुतांश गहू आणि तांदूळ याचा समावेश आहे. लॉकडाउन असल्याने एकाच वेळी तीन महिन्यांचे जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य मंजूर करण्यात आले आहे. दुकानदारांनी एकाच वेळी धान्य पुरवठा करताना दोन ग्रहकांमधील अंतर एक मीटर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही लाभार्थ्यांचे थम घ्यायचे नाहीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुकानदारांनी आपल्या आयडीवरून पावती द्यावी लागणार आहे. धान्य खरेदीसाठी आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, त्यासाठी सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था संबंधित ठिकाणी करावी लागणार आहे.दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. सध्या दीड महिना पुरेल ऐवढे ४ हजार ९६७ मेट्रिक टन नियतन धान्य शिल्लक आहे. येत्या १ एप्रिलपासून संबंधित दुकानदारांना नियतन तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे.रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस