शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१७४ स्कूल बसेसचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:48 IST

शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने स्कूल बसेस योग्य आहेत अथवा नाहीत याविषयी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी अभियान राबविले. दरम्यान, ४८४ वाहनांची तपासणी करण्यात आली होती.

ठळक मुद्देआरटीओची कारवाई : पुनर्तपासणीला चालकांनी दाखविली पाठ

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने स्कूल बसेस योग्य आहेत अथवा नाहीत याविषयी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी अभियान राबविले. दरम्यान, ४८४ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी तब्बल १७४ स्कूल बससेचालकांनी तपासणीकडे पाठ फिरविल्याने या १७४ बसेसचे परवाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने एका आदेशाद्वारे निलंबित केले.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसेस, व्हॅन बहुतांशवेळी सुरक्षित नसतात. चालक, मालकाकडून वाहनाचा विमा उतरविलेला नसतो. याशिवाय इतर दस्तऐवज नूतनीकरण केलेले नसतात. स्कूल बस नियमावली २०११ नुसार विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसमधूनच बंधनकारक करण्यात आली आहे. कोणत्याही खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण होऊ नये याची खबरदारी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष, अर्थात मुख्याध्यापकांची आहे. तशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्गदर्शक सूचनादेखील असून खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक न करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.स्कूल बसेसच्या अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता उपप्रादेशिक परिवहन विभागाने सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या मार्गदर्शनात १ मे ते ८ जून दरम्यान तब्बल ४८४ स्कूल बसेसची धडक तपासणी मोहीम राबविली. यातील ३१० वाहनांची तपासणी करण्यात आली होती.मात्र, या पुनर्तपासणी मोहिमेकडे १७४ स्कूल बसचालकांनी पाठ दाखवत तपासणी टाळल्याने या सर्व बसेसचे परवाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अखेर या बसेसचे परवाने निलंबित करण्यात आल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.चालकांना उशीरा सुचले शहाणपण१७४ स्कूल बसेसवर परवाना निलंबनाची कारवाई होताच उशीरा का होईना काही चालक, मालकांनी खडबडून जागे होत परवान्याचे नूतनीकरण आणि इतर सोपस्कार पार पाडण्याकरिता परिवहन कार्यालय गाठण्याकरिता धावपळ चालविली असल्याचे यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा