शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत केल्या १७ सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:16 IST

आॅस्टीओआर्थ्रायटीस आणि ºहूमॅटॉईड आर्थ्रायटीस म्हणजेच अस्थिसंधीशोध, सांध्यांचा दाह, संधीवात या वर्तमानात आढळणाºया आरोग्यविषयक समस्या आहेत.

ठळक मुद्देसावंगी मेघे रुग्णालयातील अस्थिशल्यक्रिया विभागाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आॅस्टीओआर्थ्रायटीस आणि ºहूमॅटॉईड आर्थ्रायटीस म्हणजेच अस्थिसंधीशोध, सांध्यांचा दाह, संधीवात या वर्तमानात आढळणाºया आरोग्यविषयक समस्या आहेत. अत्याधिक काम, जड वस्तूंचे वहन, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे सांध्यांबाबतच्या समस्या उद्भवतात. यात गुडघे, कंबर खांदे आदींच्या सांध्यांचे निकामी होणे होय. सांधे निकामी झालेल्या १७ रुग्णांवर दोन महिन्यांत कृत्रिम सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय अस्थिरोग विभाग सावंगी (मेघे) द्वारे करण्यात आल्या.एप्रिल महिन्यात सावंगी रुग्णालयात झालेल्या अस्थिरोग तपासणी शिबिरात सांधेदाह व अन्य समस्यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यांचे सांधे प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलेल्या रुग्णांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अस्थिशल्यचिकित्सक तथा सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. संजय देशपांडे, डॉ. वसंत गावंडे, डॉ. विवेक मोरे यांच्या मार्गदर्शनात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गजानन पिसूळकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सुमारे २५० अस्थिविकार व संधीवाताचे रुग्ण या शिबिरात सहभागी झाले होते. सुमारे ६० रुग्णांना कटीभाग व गुडघ्यांच्या सांध्यांचे प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचे तपासणीत दिसून आले. यातील १७ रुग्णांवर डॉ. पिसूळकर यांनी सांधे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या.सावंगी रुग्णालयात सुरू असलेल्या दत्तात्रय आरोग्य विमा कार्ड तसेच मुख्यमंत्री आरोग्य निधीतून या शस्त्रक्रियांसाठी तरतूद करण्यात आल्याने रुग्णांना आधुनिक सुविधेचा विनामूल्य लाभ प्राप्त झाला. शस्त्रक्रिये पश्चातच्या नियमित भौतिकोपचारानंतर या सर्व रुग्णांचे दैनंदिन कार्य पूर्ववत व वेदनारहित सुरू झाले आहे. सांध्यांचे विकार अधिक गुंतागुंतीचे आणि गंभीर होण्यापूर्वीच आधुनिक उपकरणांच्या साह्याने तपासणी करणे महत्त्वाचे ठरते. आज आधुनिक वैद्यकीय सुविधा व सांधे प्रत्यारोपणाच्या अद्यावत शस्त्रक्रिया उपलब्ध असल्या तरी शस्त्रक्रियेची वेळच येऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात व कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल केला पाहिजे. तसेच शरीराला नियमित व्यायामाची सवयही लावून घेतली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अस्थिशल्यचिकित्सक डॉ. श्रीवास्तव यांनी केले. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल डॉ. गजानन पिसूळकर यांनी कुलपती दत्ता मेघे तसेच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे यांचे आभार व्यक्त केले.