शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोक न्यायालयाच्या माध्यमातून झाला 16,572 प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

लोक न्यायालयात तडजोडीअंती प्रकरणे निकाली काढली जातात. शिवाय केसचा निकाल झटपट लागतो. तोंडी पुरावा-उलट तपासणी-दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नसून एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. विशेष म्हणजे लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कुणाची हार होत ना कुणाची जीत होते. 

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस कचेरी आणि न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ स्वत:वर येऊ देऊ नका असा सल्ला प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती देतात. पण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पुढाकारातून मागील सहा वर्षांत जिल्ह्यात वेळोवेळी पार पडलेल्या लोक न्यायालयाच्या माध्यमातून तब्बल ६१ कोटी ९२ लाख २७ हजार ५४७ तडजोड मूल्य असलेल्या १६ हजार ५७२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.लोक न्यायालयात तडजोडीअंती प्रकरणे निकाली काढली जातात. शिवाय केसचा निकाल झटपट लागतो. तोंडी पुरावा-उलट तपासणी-दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नसून एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. विशेष म्हणजे लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कुणाची हार होत ना कुणाची जीत होते. इतकेच नव्हे तर दोन्ही पक्षांना समाधान मिळते. लोकन्यायालयात निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे द्वेष वाढत नाहीत. तर वेळ आणि पैशाची बचत होते. तसेच निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. मागील सहा वर्षांचा विचार केल्यास लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांचा आलेख वर चढणाराच दिसत आहे.

वर्धा जिल्ह्यातील काम ठरतेय इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी-    कोविड संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. असे असले तरी कोविड संकट काळातही वर्धा येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पुढाकारातून तब्बल ८ हजार ९७६ प्रकरणांचा लोक न्यायालयाच्या माध्यमातून निपटारा झाला आहे. कोविड संकट काळातील वर्धा जिल्ह्यातील हेच कार्य राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोक न्यायासमोर दावा कसा येऊ शकेल? 

-    ज्या न्यायालयात आपला खटला प्रलंबित आहे, तेथे एक साधा अर्ज देऊन केसच्या कुठल्याही टप्प्यावर आपण आपला खटला लोक न्यायालयापुढे नेऊ शकता. -    असा अर्ज आल्यावर न्यायाधीश दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतात. शिवाय दाव्यातील वाद आपसात समजुतीने मिटू शकेल असे मत झाल्यास प्रकरण लोक न्यायालयापुढे ठेवण्याचा आदेश करतात. -    दावा व कैफियतीतीत कथनांवरून संबंधित न्यायाधीशांना प्रकरणाची आपसात समजुतीने मिटण्याची शक्यता वाटली तर कुठल्याही पक्षाचा अर्ज नसला तरी न्यायाधीश स्वतःहून खटला लोक न्यायालयाकडे वर्ग करू शकतात.

मागील सहा वर्षांत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पुढाकाराने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून ६१.९२ कोटी तडजोड मूल्याची १६ हजार ५७२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. येत्या १२ मार्चला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.- निशांत परमा, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत