शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

१५० विद्यार्थी १० सीजीपीएत

By admin | Updated: May 29, 2016 02:16 IST

सीबीएसई दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. हा निकाल श्रेणीनुसार असल्याने यात जिल्ह्यातून प्रथम कोण हे कळणे कठीणच ठरले.

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर : १० शाळांचा निकाल १०० टक्केवर्धा : सीबीएसई दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. हा निकाल श्रेणीनुसार असल्याने यात जिल्ह्यातून प्रथम कोण हे कळणे कठीणच ठरले. काही शाळांनी टक्केवारीनुसार निकाल जाहीर केला तर काहींनी अशी टक्केवारी चुकीचे असल्याचे म्हणत श्रेणीनुसार निकाल दिला. केंद्रीय बोर्डाने हा निकाल जाहीर करताना सीजीपीए अशी श्रेणी पद्धत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील शाळांनी दिलेल्या माहितीनुसार १५० विद्यार्थी सीजीपीए श्रेणीत आले आहेत. या अभ्यासक्रमाच्या जिल्ह्यात एकूण ११ शाळा आहेत. यातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यात सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयातून ८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. येथील २७ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीत १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही विषयात १०० पैकी १०० गुण घेतल्याचे शाळेकडून कळविण्यात आले आहे. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्यानिकेतन येथून १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांनी केंद्रीय बोर्डाने दिलेल्या सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. वर्धेच्या गांधी सिटी पब्लिक स्कूल येथून २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीत १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. म्हसाळा येथील अग्रगामी कॉन्व्हेंट येथून ४५ विद्यार्थ्यांनी या सत्रात दहावीची परीक्षा दिली. त्यातील सहा विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या निर्णयानुसार सीजीपीए श्रेणीत १० पैकी १० गुणांकन घेतले. सावंगी (मेघे) येथील अल्फोन्सा स्कूल मधून १०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १७ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेत यश प्राप्त केले. हिंगणघाट तालुक्यातील भवन्स गिरधरदास मोहता विद्यामंदिरातून ३४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. येथीलच सेंट जॉन कॉन्व्हेंट येथून १८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा घेतली. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांनी सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन घेतले. पुलगाव येथील केंद्रिय विद्यालयातून एकूण ७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नऊ विद्यार्थ्यांना सीजीपीए श्रेणीनुसार १० पैकी १० गुणांकन प्राप्त केले. सावंगी (मेघे) येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स मधून १२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील पूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० गुणांकन घेतले आहे. त्याचप्रमाणे पवनार येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशल स्कूल येथील एकाने १० सीजीपीए घेतला. रमाबाई देशमुख पब्लिक स्कूलनेही १०० टक्के निकाल दिला.(प्रतिनिधी)