शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर १५ हजार रुपये घ्या, वरून ३ लाखांचे कर्ज मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:47 IST

पीएम विश्वकर्मा योजना : २२ प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसाहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गावगाड्यातील कारभार आजही पारंपरिक व्यवसायावरच अवलंबून आहे. आधुनिकीकरणात या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि गावगाड्याची अर्थव्यवस्था चालविणारे १८ बलुतेदार गावात होते. यांना गावातच रोजगार मिळत असल्याने त्यांना शहरात येण्याची गरज नव्हती. मात्र काळाच्या ओघात अनेकांचे व्यवसाय बंद पडले. 

आधुनिकीकरणात या व्यवसायाचा टिकाव लागला नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली. त्यामुळे पुन्हा या व्यवसायांना नव्याने चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशभरात राबवायला सुरुवात केली आहे. आधी या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ हजार रुपये देतात. इतकेच नाही तर रोजगार उभारण्याकरिता ३ लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध होत असल्याने त्याचा लाभ दिला जातो. आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो कारागिरांनी याचा लाभ घेतल आहे.

हे कारागीर योजनेचे लाभार्थी सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीरांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

योजनेबद्दल ठळक बाबी....

  • 'स्किल इंडिया' पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार त्यानंतर प्रशिक्षण 
  • कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक 
  • प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार 
  • प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरुवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये 
  • बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्ज

अर्जाकरिता या कागदपत्रांची आवश्यकताया योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट छायाचित्र, बैंक पासबुक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-acवर्धा