शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी कधीच वीज देयके भरली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 15:19 IST

जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या रकमेची थकबाकी

आॅनलाईन लोकमतवर्धा  : जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी   महावितरणकडून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ जाहीर करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यात शेती पंप धारकांची संख्या ६८ हजार आहे. यातील ९० टक्के शेतकरी महावितरणची देयके भरीत नाहीत.  महावितरणकडून घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि कृषी पंप धारकांना वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून दरमहा जो महसूल गोळा केला जातोे त्यापैकी ८५% रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मागील ३ वर्षात राज्यात एकही थकबाकीदार शेतकऱ्याचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलं नाही. पण थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने महावितरण समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ८५२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ६७. ७६ लाख रुपये, आष्टी उपविभागात १२९० कृषी पम्प वीज ग्राहकांनी १८.८४ लाख रुपये, कारंजा उपविभागात १५४३ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ५४ लाख रुपये, खरंगाना ( ग्रामीण)  उपविभागात ६१५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी २० लाख रुपये, पुलगाव (शहर) उपविभागात ९४२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १४ हजार रुपये, हिंगणघाट (शहर) उपविभागात ५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ११ हजार रुपये, हिंगणघाट उपविभागातील ३६९४ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ४ कोटी २२ लाख रुपये , समुद्रपूर उपविभातील २,२२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ८६ लाख रुपये, देवळी  उपविभातील १५२९ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १ लक्ष रुपये, सेलू उपविभातील ८२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ९३ लाख रुपये, वर्धा उपविभागातील २२७१ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी ठेवली आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांस ३०,००० रुपयांपर्यंत थकबाकी असल्यास डिसेंबर २०१८ पर्यंत ५ समान हप्त्यात ही रक्कम भरावी लागणार असून सोबत चालू देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे. ३०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्यास १० सामान हप्ते मिळणार आहेत. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी सादर योजनेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी