शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१५ जुलैनंतर वर्धेत पाणी पेटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात ...

ठळक मुद्दे‘धाम’ मध्ये केवळ नाममात्र जलसाठा : आकाशाकडे साऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात सध्या केवळ नाममात्र मृत जलसाठा आहे. या जलसाठ्याचे योग्य नियोजन करून त्या पाण्याचा केवळ १५ जुलैपर्यंत नागरिकांना पुरवठा केल्या जाऊ शकत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वीच पाऊस लांबला गेल्याने आणि आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहत दमदार पाऊस न झाल्यास वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांत पाणी समस्या पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच करणे गरजेचे आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पात ३२८.६०० दलघमी पाणी साठविल्या जाऊ शकते. परंतु, मागील दोन वर्षात दमदार पाऊस जिल्ह्यात न झाल्याने हा प्रकल्प पाहिजे त्या प्रमाणात भरला नाही. शिवाय जेव्हा हा प्रकल्प तयार करण्यात आला तेव्हापासून या प्रकल्पातून एक ट्रॉलीही गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाणी साठवण क्षमता कमीच झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशातच यंदा या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याचा विडा जिल्हा प्रशासनासह वर्धा पाटबंधारे विभागाने उचलला असता तरी मागील १ महिना २३ दिवसात केवळ ४० हजार घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. वास्तविक पाहता या प्रकल्पात सुमारे ५ लाख घ.मी. गाळ असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांचा आहे. तर याच प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग करून पाण्याचा पुरवठा नागरिकांना करते. मात्र, सध्या स्थितीत या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपला असून सध्या मृत जलसाठ्याची उचल केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाने वर्धा शहर व परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पातील पाणी सोडले होते. त्यामुळे सध्या या प्रकल्पातील मृत जलसाठ्यात किमान एक ते दीड मिटरने घट झाल्याचे वास्तव आहे. तर सध्या असलेल्या मृत साठ्यापैकी जास्तीत जास्त ३ दलघमी पाण्याची उचल करता येईल. शिवाय ते पाणी नागरिकांना १५ जुलैपर्यंत देता येईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. मात्र, येत्या काही दिवसात दमदार पाऊस होत धाम नदी दुथडी भरून न वाहिल्यास तसेच धाम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ न झाल्यास जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून भीषण पाणी समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.गाळ नेण्याकडे शेतकऱ्यांची पाठधाम प्रकल्पातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांनी नि:शुल्क न्यावा, असे आवाहन कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे. परंतु, सदर गाळ शेतापर्यंत नेण्यासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने आणि तो या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने कुणीही शेतकरी गाळ नेण्यासाठी पसंदी दर्शवित नसल्याचे चित्र या परिसरात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलत धाम प्रकल्प गाळमुक्त करून या भागातील शेतशिवार गाळयुक्त करावे, अशी मागणी आहे.