लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नवीन आष्टी ग्रामपंचायत मध्ये घरकूल वाटपात भ्रष्टाचार झाल्याने सरपंच संतप्त झाल्या. याविरोधात १५ नागरिक पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले आहे. गटविकास अधिकाºयांच्या विरोधात तक्रार असल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा येथून अधिकारी चौकशीला आले आहेत. या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.घरकूल योजनेमध्ये तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये एकूण १७ लाभार्थी गुणांकन प्रमाणे निवड करण्यात आली होती. सध्या एक घरकूल मंजूर झाले आहे. त्यासाठी यादीप्रमाणे पहिल्या लाभार्थ्याला लाभ न देता थेट १५ व्या क्रमांकावर असलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यासोबतच शेतकºयांच्या विहीर बांधकामात प्रचंड घोळ झाला आहे. विहीर बांधकाम होवूनही मंजुरी व साहित्य बांधकामाचे मस्टर काढण्यात आले नाही. त्यामुळे उसनवारीने गोळा केलेले पैसे फेडण्यास शेतकरी असमर्थ झाले आहे.शौचालय बांधकाम झाले त्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले नाही. यामुळे बांधकाम होणे बाकी आहे. अशा लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले. नवीन आष्टी ग्रामपंचायत १०० टक्के हागणदारी मुक्त झाली असा रेकॉर्ड दाखवून पुरस्कार घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. गत वर्षभरापासून वॉर्ड क्र. ३ मधील पाणी टंचाईचा प्रस्ताव टाकला. त्यावरही कारवाई नाही त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.यासर्व प्रकाराला सरपंच व गावकºयांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी, शाखा अभियंता व ग्रामसेवक यांना जबाबदार धरले आहे. याविरोधात आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सरपंच अरुणा गजरे, उपसरपंच सविता पोटे, अमोल पवार, यांच्यासह १५ नागरिक उपोषणास बसले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू झाली असून याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहे.
१५ नागरिक आमरण उपोषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:04 IST
नवीन आष्टी ग्रामपंचायत मध्ये घरकूल वाटपात भ्रष्टाचार झाल्याने सरपंच संतप्त झाल्या. याविरोधात १५ नागरिक पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले आहे.
१५ नागरिक आमरण उपोषणावर
ठळक मुद्देघरकूल वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप : सरपंचासह गावकरी संतप्त