शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१४० सावकारी कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: February 5, 2016 01:46 IST

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ६२४ कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

अनेकांचे गहाण सावकाराकडेच : १ कोटी ३७ लाख रुपयांची प्रतीक्षावर्धा : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ६२४ कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ३६ लाख ५१ हजार ८१४ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सावकारी कर्जमाफीचे नव्याने १४० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीद्वारे मंजूर केले आहे. या शेतकऱ्यांना १७ लक्ष ३९ हजार ८१४ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे, असे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी कळविले आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तरी त्यांना त्यांच्या गहाणाबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जिल्ह्यात पाच कोटी गरज असताना केवळ चार कोटीच रुपये मिळाले आहेत. यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. संपूर्ण कर्जमाफीकरिता एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांची गरज आहे. जिल्हास्तरीय समितीच्या सभेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग चुटके, सहाय्यक निबंधक जयंत तलमले, सहाय्यक निबंधक वनस्कर, निनावे, वडे उपस्थित होते. या संदर्भात जिल्ह्यातील काही पात्र शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कर्जमाफी लाभ मिळाला नसला त्यांनी संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.(प्रतिनिधी)