शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१४ टेबलवरून होणार २७ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:07 IST

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी, २३ मे रोजी स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून १४ टेबलावरून २७ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

ठळक मुद्देमतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी, २३ मे रोजी स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून १४ टेबलावरून २७ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून पोस्टल बॅलेटच्या, तर ८.३० वाजतापासून ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी होणार आहे. तसेच ज्या मतदान केंद्रातील ईव्हीएम सुरू होणार नाही, त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या परिसरात मतमोजणी करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी काही अपवाद वगळता कुणालाही मोबाईल नेता येणार नाही. शिवाय ज्यांच्याकडे पास आणि ओळखपत्र आहे, अशांनाच मतमोजणी परिसरात जाता येणार आहे. वर्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४ उमेदवार आहेत; पण कमीत कमी १८ तासांत नवीन खासदार कोण, हे स्पष्ट होणार आहे.अशी पारदर्शी होईल मतमोजणीआक्षेप नोंदविणाºयांना निवडणूक निर्णय अधिकाºयांना लेखी अर्ज द्यावा लागणार आहे.एक फेरी होईपर्यंत दुसऱ्या फेरीच्या पेट्या येणार नाहीत.एकदा एन्ट्री झाल्यावर मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळविणाऱ्याला बाहेर पडता येणार नाही.वर्धा लोकसभा क्षेत्रातील १० लाख ६५ हजार ७७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवाय, काहींनी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान केले होते. याच मतांची गुरुवारी मोजणी होणार आहे.वर्धा लोकसभा क्षेत्रातील एकूण ३० भाग्यवान मतदान केंद्रांची सोडत पद्धतीने निवड करून या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या हस्ते भाग्यवान मतदान केंद्राच्या नावाची चिठ्ठी काढण्यात येणार आहे.मतमोजणी प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यासाठी सुमारे ४५० मनुष्यबळ कार्यरत करण्यात आले आहे. शिवाय, मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त असणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शी व्हावी या हेतूने २८ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच ३० व्हिडीओग्राफरही मतमोजणीचे चित्रीकरण करणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९