लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलिसांच्या विशेष पथकाने सिंदी (रे.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत विदेशी दारूसाठा जप्त केला. कांढळी फाटा येथे दारूची वाहतूक करीत असलेल्या वाहनाची झडती घेतली असता एमएच ४० एके ११८४ मध्ये दारूच्या पेट्या आढळल्या. यात वाहनासह १३ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शंकर दानानी याच्याकडून सदर दारूसाठा सुरेश नामदेव गेडाम (३८) रा. बुरड मोहल्ला, वर्धा हा विक्रीकरिता घेवून येत होता. पोलिसांनी सापळा रचुन कारवाई केली. याप्रकरणी शंकर दानानी, सुरेश गेडाम, संजु तायवाडे याच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात सुधीर कोडापे, गजानन गिरी, दिनेश तुमाने, विलास गमे, सतीश जांभुळकर, योगेश चन्ने, रणजित काकडे, तुषार भुते, योगेश घुमडे, रोशन पाचरे, अमोल तिजारे, चालक अजय वानखेडे, राहुल गोसावी यांनी केली.
वाहनासह १३.८ लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:54 IST
पोलिसांच्या विशेष पथकाने सिंदी (रे.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत विदेशी दारूसाठा जप्त केला.
वाहनासह १३.८ लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त
ठळक मुद्देतिघांवर गुन्हा दाखल : विशेष पथकाची कारवाई