शेडगाव येथील कारवाई : वाहनाचा पाठलाग करून अटकसमुद्रपूर : अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असताना वाहनासह १३ लाख ७४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शेडगाव फाटा येथे नाकाबंदी करून समुद्रपूर पोलिसांनी केली. यात आरोपींना अटक करण्यात आली.रौनक सुरेशसिंग चव्हान रा. विश्रामनगर नागपूर हा स्कॉर्पिओ एम.एच. ३१ डी.के. ३७०५ ने अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून शेडगाव फाटा येथे नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान सकाळी ८.३० वाजता सदर वाहन पोलिसांना पाहून पळून गेले. यामुळे पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. पंचासमक्ष वाहन व आरोपींची झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या ५२ पेट्या किंमत ३ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा माल आढळून आले. यात वाहनासह १३ लाख ७४ हजार ४०० रुपयांया मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रौनक सुरेशसिंग चव्हाण (२३) व अनिकेत प्रभाकर गडलवार (१९) दोन्ही रा. नागपूर व देशी दारू दुकानमालक मुकेश जैस्वाल यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक चाटे यांच्या निर्देशानुसार सहा. पोलीस निरीक्षक ए.एम. जिट्टावार, अशोक साबळे, किटे, राजू ठाकूर, वैभव कट्टोजवार, अमीत शुक्ला यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)समुद्रपूर : अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असताना वाहनासह १३ लाख ७४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शेडगाव फाटा येथे नाकाबंदी करून समुद्रपूर पोलिसांनी केली. यात आरोपींना अटक करण्यात आली.रौनक सुरेशसिंग चव्हान रा. विश्रामनगर नागपूर हा स्कॉर्पिओ एम.एच. ३१ डी.के. ३७०५ ने अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून शेडगाव फाटा येथे नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान सकाळी ८.३० वाजता सदर वाहन पोलिसांना पाहून पळून गेले. यामुळे पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. पंचासमक्ष वाहन व आरोपींची झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या ५२ पेट्या किंमत ३ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा माल आढळून आले. यात वाहनासह १३ लाख ७४ हजार ४०० रुपयांया मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रौनक सुरेशसिंग चव्हाण (२३) व अनिकेत प्रभाकर गडलवार (१९) दोन्ही रा. नागपूर व देशी दारू दुकानमालक मुकेश जैस्वाल यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक चाटे यांच्या निर्देशानुसार सहा. पोलीस निरीक्षक ए.एम. जिट्टावार, अशोक साबळे, किटे, राजू ठाकूर, वैभव कट्टोजवार, अमीत शुक्ला यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
१३ लाख ७४ हजारांचा दारूसाठा वाहनासह जप्त
By admin | Updated: July 5, 2015 01:19 IST