शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१२२ विषयांना मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:21 IST

महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम ८१ (४) अन्वये सोमवारी अण्णाभाऊ साठे सभागृहात वर्धा न.प.ची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देवर्धा पालिकेची सर्वसाधारण सभा : विविध विषयांवर चर्चा

आॅनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम ८१ (४) अन्वये सोमवारी अण्णाभाऊ साठे सभागृहात वर्धा न.प.ची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभागृहाने १२२ विषयांना मंजुरी दिली.न.प.च्या आजच्या सर्वसाधारण सभेत एकूण १२३ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका विषयावर सभागृहाची सर्व संमती मिळाली नाही. ६८ क्रमांकाचा विषय असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत वर्धा शहर मलनिस्सारण योजनेकरिता प्राप्त तीन निविदेपैकी सर्वात कमी दराची निविदा मे. पी.एल. अडके यांची पूर्ण मुल्यांकीत दराच्या २.०१५ टक्के कमी दराच्या निविदेस मान्यता मिळावी म्हणून हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता; पण याच विषयाला बहूमत मिळू शकले नाही.वर्धा पालिकेत भाजपाची सत्ता आहे. आजच्या सर्वसाधारण सभेला नगरसेवकांचे बहूमत असले तरी तीन नगरसेवकांनी सभेला गैरहजर असल्याचे सुत्रांनी सांगितले. या सभेत सुंदर व हरित वर्धेच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन अनेक विषयांवर सभागृहात चर्चा झाली. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत टप्पा दोनच्या विकास कामांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा विषयही चर्चेत आला.विकासकामांत पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित ठेवाशहरातील पोद्दार बगीचा येथील हनुमान मंदिर जवळच्या खुल्या जागेत संरक्षण भिंत व पेव्हमेंटच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. याच भागातील मगनवाडी परिसरात मोठाली वृक्ष असून तेथे दररोज लाखो पोपट मुक्कामी येतात. याच मोकळ्या जागेवर पक्षी संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून न.प.चे योग्य नियोजन करीत विशेष विकास कामे हाती घ्यावे व ती पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांसह पक्षीप्रेमींची आहे.सायलेंट झोनचा विरोधनगर परिषदेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. याचा नगरसेवक बंटी गोसावी यांनी विरोध केला असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.