शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

१२00 सहकारी संस्थांना धोका

By admin | Updated: May 24, 2014 23:49 IST

वर्धा, नागपूर व बुलढाणा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका रिझर्व्ह बँकेने नुकत्याच अवसायनात काढल्या आहेत. त्यामुळे आता या तिनही बँका बंद होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले. त्यामुळे एकट्या वर्धा

फनिंद्र रघाटाटे - रोहणा

वर्धा, नागपूर व बुलढाणा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका रिझर्व्ह बँकेने नुकत्याच अवसायनात काढल्या आहेत. त्यामुळे आता या तिनही बँका बंद होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले. त्यामुळे एकट्या वर्धा जिल्ह्यात सदर बँकेशी आर्थिकदृष्ट्या संलग्न असलेल्या गावागावातील सेवा सहकारी संस्था, कर्मचारी पतसंस्था व इतर सेवा सहकारी संस्था अशा एकूण १२00 संस्था प्रभावितच होणार नाही तर यातील अनेक संस्था बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, वर्धा, नागपूर व बुलढाणा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका मागील दोन वर्षांपासून आर्थिक डबघाईस आल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी आर्थिक स्थिती मजबूत न केल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत दिले होते. असे असतानाही संचालक मंडळ आर्थिक स्थिती मजबूत करू शकले नाही. राज्य शासनाने देखील जालना, धुळे, नंदूरबार या बँकाना आर्थिक पॅकेज देत सरंक्षण दिले. विदर्भातील तिनही बँकांना पॅकेजमधून वगळल्याने त्या बँका अवसायनात निघण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यात ४0७ सेवा सहकारी संस्था, १९५ कर्मचारी सहकारी पतसंस्था, आठ अर्बन बँका, १३५ मजूर कामगार संस्था, ५८ जंगल कामगार संस्था काही महिला बचत गट, पाणी पुरवठा संस्था व मच्छीमार संस्था अशा १२00 सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या निगडीत आहे. या सर्व सहकारी संस्थांनी आपला आर्थिक व्यवहार वर्धा जिल्हा सहकारी बँकेतूनच करावा असा राज्य शासनाचा दंडक होता. त्यामुळे या सर्व सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या संस्थांचा मोठा निधी जिल्हा बँकेत अडकून आहे.

आता तर बँक अवसायनात निघाल्याने नियमानुसार खातेदारांच्या फक्त १ लक्ष रुपयापर्यंतचा रक्कमेलाच विमा सरंक्षण आहे. म्हणजेच १ लाखापेक्षा ज्यांची आर्थिक रक्कम या बँकेत अडून पडली त्या रकमेला कोणतेच कायदेशीर सरंक्षण नसल्याचे वास्तव आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे.