शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

ओव्हरलोड वाहतुकीतून १.१५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:41 IST

रस्त्यांची तथा वाहनांची भार वहन क्षमता ठरलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक केल्यास रस्ते तथा वाहने खराब होतात, हे सर्वश्रूत आहे.

ठळक मुद्दे१००७ वाहनांची केली तपासणी : २७४ वाहनांवर जप्तीची कारवाई

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : रस्त्यांची तथा वाहनांची भार वहन क्षमता ठरलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक केल्यास रस्ते तथा वाहने खराब होतात, हे सर्वश्रूत आहे. भार वहन क्षमतेच्या आधारवरच पासिंगही केले जाते; पण बहुतांश वाहन धारक नफ्याच्या नादात क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करतात. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दहा महिन्यांत तब्बल १ हजार ७ वाहने तपासली. यात १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. यात जानेवारी महिन्यात ८२ वाहने तपासण्यात आलीत. यातील ३१ वाहने दोषी आढळून आली. पैकी २९ प्रकरणे निकाली काढत माल उतरवून ती वहने सोडून देण्यात आली. ८ वाहने आरटीओने जप्त केली आहेत. या एक महिन्याच्या कारवाईत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने स्थानिक तडजोड शुल्क ६ लाख ४६ हजार रुपये व विभागीय तडजोड शुल्क म्हणून २ लाख ७७ हजार रुपये असा ९ लाख २३ हजार रुपये दंड वसूल केला आहे.एप्रिल ते डिसेंबर २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेणारी ९२५ वाहने आरटीओकडून तपासण्यात आलीत. यात ४०७ वाहने दोषी आढळून आली. ३७३ प्रकरणे निकाली काढत त्यातील माल उतरवून वाहने सोडण्यात आली. यातील २६६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये स्थानिक तडजोड शुल्क म्हणून आरटीओने ७४ लाख २१ हजार रुपये तर विभागीय तडजोडीपोटी ३१ लाख ९८ हजार रुपये, असा १ कोटी ६ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.दहा महिन्यांच्या कालावधीत तपासणी केलेल्या १ हजार ७ पैकी ४३८ वाहने दोषी आढळून आलीत. यातील ४०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून माल उतरवून वाहने सोडण्यात आली आहेत. एकूण २७४ वाहने जप्त केली. कारवाईमध्ये १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.शहरातून अधिक भारवहन करणाऱ्या जड वाहनांना सूट आश्चर्यकारकराष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग तथा जिल्हा मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक भार वहन करणाऱ्या जड वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. यातून १.१५ कोटींचा दंडही वसूल करण्यात आला; पण यातून शहरातील जड वाहने वगळली जात असल्याची चर्चा आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांत आहे. यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात. वास्तविक, कारवाईमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेला जात असेल तर त्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.ओव्हरलोड वाहतुकीबाबत सर्वत्र कारवाई केली जाते. यात बहुतांश वाहने अन्य जिल्हा वा राज्यातील असतात तशी वर्धा जिल्ह्यातीलही असतात. वर्धा शहरातील वाहने ओव्हरलोड वाहतूक करीत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाते.- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.रस्त्यांचीही होतेय चाळणीक्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केल्यामुळे वाहनांसह रस्त्यांचीही चाळणी होते. ग्रामीण, शहरी, जिल्हा तथा राज्य मार्गांची भार वहन क्षमता वेगवेगळी असते. ग्रामीण तथा शहरी रस्ते अधिक अवजड वाहतूक सोसू शकत नाही. जिल्हा मार्गही त्या तुलनेत कमकुवतच असतात. असे असले तरी सर्वच मार्गांवर सर्रास ओव्हरलोड वाहतूक केली जाते. यामुळे अनेक रस्त्यांची क्षमता नसल्याने चाळणी होत असल्याचे पाहावयास मिळते.