शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:48 IST

शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणी करताना दक्ष राहणे गरजेचे

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यापैकी दोन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका व्यक्तीला शासकीय अनुदान देण्यात आले आहे.पिकांवर येणारे विविध रोग आणि किटकांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची कृषी केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी उभ्या पिकांवर करतात. सदर किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्या अशा सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही देण्यात येत आहे. फवारणी करणाऱ्यांकडून फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय फवारणी करताना कुठल्याही खाद्यपदार्थ सेवन करणे हे धोक्याचे ठरते. परंतु, अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते. गत वर्षी किटकनाशकांची फवारणी करताना वर्धा जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांना आणि ६८ शेतमजुरांना अशा एकूण ७६ व्यक्तींना विषबाधा झाली होती. त्यापैकी वडनेर एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला जिल्हा प्रशासनाच्यावतीने ४ लाखांचे शासकीय अनुदान देण्यात आले आहे. तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांसह शेतमजुरांना किटकनाशके फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी अल्लीपूर येथील एका तरुण व अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सेवाग्राम येथील रुग्णालयात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.दोघांना गमवावे लागले प्राणकिटकनाशकांची फवारणी करताना योग्य दक्षता न घेणे हा प्रकार जीवावर बेतू शकतो. मागील वर्षी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे याचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाला होता. तर यंदाच्या वर्षी याच तालुक्यातील अल्लीपूर येथील विठ्ठल प्रभाकर भुसारी (३३) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सकाळी झाला. त्यामुळे किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला मळमळ होणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येत असल्यास त्या व्यक्तीने तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. विषबाधा झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास तो रुग्ण बरा होऊ शकतो.- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती