शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी लाईट खरेदीत ११ लाखांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:28 IST

नगरपंचायतमध्ये लावण्यात येत असलेल्या एलईडी लाईटमध्ये ११ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदमध्ये केला आहे. याबाबतचे सबळ पुरावे त्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे भाजप नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायतमध्ये लावण्यात येत असलेल्या एलईडी लाईटमध्ये ११ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदमध्ये केला आहे. याबाबतचे सबळ पुरावे त्यांनी दिले आहेत.विश्रामगृहात आयोजित या पत्रपरिषदेत भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक सुरेश काळपांडे, अजय लेकुरवाळे यांनी माहिती दिली. आष्टी नगरपंचायत अंतर्गत आष्टी शहरात सार्वजनिक लाईट बसविण्याची निविदा काढली होती. सदर निविदा काढताना विरोधी पक्षाच्या नगसेवकांना कुठलीही माहिती दिली नाही. सभागृहात यावर काहीही चर्चा करण्यात आली नाही. ई-निविदा विषय घेताना सभागृहाला माहिती देणे अनिवार्य होते; पण तसे झाले नाही.निविदा प्राप्त झालेले आर्वी येथील ठेकेदार कदम यांनी हिंदुस्थान कंपनीचे एलईडी लाईट दाखविले. एका लाईटची किंमत ४,८०० ते ५,२०० या दराने मंजूर केली. मार्केटमध्ये अशी कुठलीही कंपनी अस्तित्वात नसल्याचा आरोपही करण्यात आला. निविदेतील अटी व शर्तीनुसार पथदिव्यांवर लावण्यात आलेले एलईडी लाईट नामांकित कंपनीचे आय.एस.ओ. मार्क पाहिजे होते; पण बाजारपेठेत नामांकित कंपनीच्या एलईडी लाईटच्या दराबाबत पडताळणी केली असता फिलीप्स कंपनीचे दर २ हजार ५०० रुपये असून ४ वर्षांची वॉरंटी दिली जाते. ओसाराम कंपनीचे लाईट १ हजार ८०० रुपये तर सिसका कंपनीचे दर २ हजार ६५० रुपये असून ४ वर्षे वॉरंटी दिली जात असल्याचे निदर्शनास आले.नगरपंचायत मार्फत निम्न दर्जाचे कंपनीचे एलईडी लाईट चढ्या दराने खरेदी करण्यात आले. सध्या झालेली निविदा एकूण २२ लाख ३६ हजार ८१२ रुपये एवढ्या किंमतीची आहे. एवढ्या रक्कमेमध्ये ३५० एलईडी लाईट लावायचे आहे. त्यामुळे मूळ मुल्यांकन काढले तर केवळ ११ लाख मध्ये ३५० लाईट लावणे शक्य आहे. मग, शासनाच्या निधीची अपव्यय करून विल्हेवाट लावण्याची सक्ती का? हा प्रश्न सभागृहात कायम आहे. नगर पंचायतमध्ये योजनेची माहिती न देता परस्पर निविदा मॅनेज करून निकृष्ट दर्जाची कामे व गैरप्रकाराला थारा दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.सभागृहात ठराव मंजूर झाल्याशिवाय व नगरसेवकांना विश्वसात घेवून चर्चा केल्याशिवाय सदर ठेकेदाराचे देयक काढू नये, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाºयांनी करावी, अशी मागणीही त्यांच्यावतीने यावेळी करण्यात आली.एलईडी लाईटबाबत सभागृहात चर्चा करून ठराव झाला. त्याप्रमाणे रितसर ई-निविदा झाली. नियमाप्रमाणेच कामकाज सुरू आहे. यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही.- पंकज गोसावी, मुख्याधिकारी, नगर पंचायत, आष्टी (शहीद).