शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथींनी घेतले कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 106 डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी एकमेव खबरदारीचा प्रभाव उपाय असल्याने वर्धेकरांचा लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा १०० टक्के ‘व्हॅक्सिनेट’ कसा करता येईल, यासाठी जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी जिल्ह्याने लसीकरणाचा ९.५० लाखांचा उंबरठा ओलांडला असून, आतापर्यंत जिल्ह्यात तृतीयपंथींनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे १०६ डोस घेतल्याची नोंद घेण्यात आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी एकमेव खबरदारीचा प्रभाव उपाय असल्याने वर्धेकरांचा लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शिवाय नजीकच्या केंद्रावर जाऊन प्रत्येक व्यक्तीने कोविड लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

सात दिवस राबविणार मिशन ‘कवच कुंडल’ अभियान-    कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला वेळीच ब्रेक लावण्यासह त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर या सात दिवसांच्या काळात जि.प.च्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत कोविडची प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या व्यक्तींनी नजीकच्या केंद्रावर जाऊन कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ७० हजार लससाठा - मिशन कवच कुंडल अभियान राबविताना जिल्ह्यात कुठेही लसीचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविड लसीचे ७० हजार डोस असून, प्रत्येक केंद्रावर मुबलक लससाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हा १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावा या हेतूने जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविले जात आहे. या मोहिमेच्या यशस्वितेकरिता शिक्षण, महिला विकास, ग्रामविकास व महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जात आहे. नजीकच्या केंद्रावर जाऊन नागरिकांनी कोविडची लस घेऊन मिशन कवच कुंडल यशस्वी करावे. कवच कुंडल मोहिमेचा एक भाग म्हणून शनिवारी १०१ केंद्रांवरून लसीकरण होईल.- प्रेरणा देशभ्रतार,  जिल्हाधिकारी, वर्धा

शुक्रवारपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात सध्या कोविड लसीचे ७० हजार डोस असून येत्या काही दिवसांत जिल्ह्याला १ लाख २० हजार लससाठा मिळणार आहे. कोविड लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असून, नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी. कवच कुंडल अभियानादरम्यान जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कोविड लस देण्याचा मानस आहे. - डॉ. प्रवीण वेदपाठक, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस