कारंजा (घाडगे) : तालुक्यातील नारा येथील १० वर्षीय मुलगा गत २० दिवसांपासून बेपत्ता आहे. याची तक्रार कारंजा पोलिसांत केली असली तरी त्यांच्याकडून गांभीर्याने त्याचा शोध घेण्यात येत नसल्याचा आरोप बेपत्ता मुलगा सद्दामशहा लतीफशहा फकीर याच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. सद्दामशहा याला गत २० दिवसांपूर्वी नारा येथून लोहार काम करणाऱ्या वेठबिगाराने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप लतीफशहा फकीर यांनी कारंजा पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला आहे. मात्र कारंजा पोलिसांनी सदर मुलाचा गांर्भीयाने तपास केला नसल्याचा आरोपही लतीफशहा फकीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवदेनातून केला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांनी मुलगा शोधून देण्याची मागणी केली. हालाखीची परिस्थीती असलेल्या लतीफशहा फकीर यांनी सदर तक्रार ही रजिस्टर पोस्टाव्दारे पाठविली आहे. त्यांच्याकडे वर्धा येथे तिकीट काढून तक्रार करण्याएवढा पैसा आपल्याकडे नसून माझा मुलगा परत मिळवून देण्यास कारंजा पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)
२० दिवसांपासून १० वर्षीय मुलगा बेपत्ता
By admin | Updated: November 22, 2014 01:37 IST