शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत १० हजार बचत खाते

By admin | Updated: August 29, 2014 00:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत.

प्रत्येक कुटुंबाचे बचतखाते : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पासबूक वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत. बचतखाते उघडलेल्या खातेदारांना बँकेचे पासबुक जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते देण्यात आले.जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना बँकेच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात व त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे सुलभ व्हावे त्यादृष्टीने अशा कुटुंबांना प्रथम प्राधान्य द्यावे, तसेच शेवटच्या घटकापर्यंत बँक प्रतिनिधी मार्फत बँकेच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिपप्रज्वलीत करून व बचतखाते उघडलेल्या कुटुंबांना बँकेचे पासबुक देवून या योनजेचा शुभारंभ केला. अग्रणी बँकेचे अनंत भिसे यांनी प्रधानमंत्री जन-धन याजनेबद्दल माहिती दिली. अध्यक्षस्थानी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. दादाराव केचे उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक अनंत भिसे व सर्वच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आभार बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक व्हि.के. जांगडा यांनी मानले. यावेळी निशिकांत घईसास, आर.आर.जोशी, एन.के.देवपुजारी, वसंत पाठक, स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक वाहीद, लाडे, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे सील, बँक आॅफ इंडियाचे नायक, नाबार्डच्या डॉ.स्रेहल बन्सोड तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक, जिवन विमा निगमचे निराळे, वर्षा चिंचखेडे आदी उपस्थित होते.प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या पहिल्याच दिवशी बँक आॅफ इंडियातर्फें एक हजार ३५५, स्टेट बँक आॅफ इंडिया तीन हजार ०९६, सेंट्रल बँक एक हजार, आयडीबीआय एक हजार ५० तसेच पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, एचडीएफसी, बँक आॅफ महाराष्ट्र, विजया बँक, आंध्र बँक आदी बँकांनी १० हजारपेक्षा जास्त बचतखाते उघडून आपला सहभाग दिला.या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे झिरो बॅलन्स या तत्वावर बँकखाते उघडण्यात येणार असून, या खात्यांना एक लक्ष रुपयाचा अपघात विमा योजना लागू राहणार आहे. तसेच सहा महिन्यापर्यंत बँकेच्या सुविधांचे लाभ घेतानाच एक हजार रुपये बँकेत जमा करण्यात येतील. त्यावर नियमित व्याज भरणाऱ्या खातेदारांना पाच हजार रुपयांपर्यंत बँकेत व्यवहार करता येतील. बचतखाते, मतदार ओळखपत्र, जॉब कार्ड, आधार कार्ड, अथवा सरपंचाद्वारे दिलेल्या ओळखपत्राद्वारे बँकेत खाते उघडू शकेल. या योजनेमुळे आर्थिक स्वावलंबन व बचत करण्याची सवय जनतेमध्ये निर्माण होईल. दोन हजार लोकसंख्येच्या आत असलेल्या गावांमध्ये बँक प्रतिनिधी मार्फत बचतखाते उघडून सर्व सुविधा घरापर्यंत देण्यात येणार आहे.