शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

१० अल्पवयीन कुटुुंबीयांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:18 IST

रेल्वे प्रवासादरम्यान अनावधानाने कुटुुंबीयांपासून काही मुल व मुली दुरावले. सदर अल्पवयीन मुल आणि मुली भांबावलेल्या अवस्थेत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मिळाले. त्यापैकी दहा अल्पवयिनांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : प्रवासादरम्यान झाली होती ताटातूट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वे प्रवासादरम्यान अनावधानाने कुटुुंबीयांपासून काही मुल व मुली दुरावले. सदर अल्पवयीन मुल आणि मुली भांबावलेल्या अवस्थेत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मिळाले. त्यापैकी दहा अल्पवयिनांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. इतकेच नव्हे तर जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सहा अल्पवयीन मुलींना तसेच तीन अल्पवयीन मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चाईल्ड लाईन संस्थेच्या हवाली केले आहे.जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत अवैध दारू तस्करी बाबतचे सात गुन्हे रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. शिवाय मोठ्या प्रमाणात दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे. तर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चार लाख रुपये किंमतीचे चंदनाचे लाकूड ताब्यात घेत ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. धावत्या रेल्वेत प्रवाशांचे साहित्य पळविणाºया दोन चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. या आरोपींना रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाई नागपूर विभागाचे वरिष्ठ रेल्वे सुरक्षा मंडळ अधिकारी ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात वर्धा रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. 

टॅग्स :Policeपोलिस