शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

१०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन

By admin | Updated: May 24, 2017 00:41 IST

कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे.

२६८ कृषी पंप मंजूर : १८६ शेतकऱ्यांनी भरली अनामत रक्कम लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. याकरिता कोरडवाहू शेती असलेल्या वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी घडक सिंचन योजनेतून विहिरी देण्यात आल्या. यात आलेल्या पाण्याचे सिंचन करता यावे याकरिता सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप शेतकऱ्यांना अनुदानावर देण्याचा निर्णय झाला. या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप सुरू केले असून त्या माध्यमातून त्यांचे सिंचन सुरू असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार २६८ सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १८६ शेतकऱ्यांनी त्यांनी केलेल्या अश्वशक्तीच्या कृषी पंपाला आवश्यक असलेले अनुदान महावितरणकडे भरले आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांकडून ते भरणे अद्याप बाकी आहे. ज्यांनी अनुदान भरले त्यापैकी १०९ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभरण्यात आले आहे. त्यांच्याकडून या माध्यमातून ओलीत करणे सुरू असल्याची माहिती आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रारंभी देण्यात आलेल्या उद्दिष्टापासून जिल्हा अद्याप दूरच असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या वर्धेत सिंचन करताना शेतकऱ्यांना भरनियमनाचा खोडा पडू नये म्हणून पहिल्या टप्यात ९२० सौर कृषी पंप देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धी झाली नसल्याने शेतकऱ्यांकडून याकरिता पाहिजे त्या प्रमाणात अर्ज आले नाही. परिणामी ही योजना रखडली. योजना सुरू होवून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. असे असताना केवळ १०९ शेतकऱ्यांकडेच हे कृषी पंप लागले आहेत. यामुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता तिची आणखी प्रसिद्धी होणे गरजेचे असून याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे. ८२ शेतकऱ्यांची अर्जानंतर माघार सौर कृषी पंपाकरिता अर्ज करून तो मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ८२ शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याकरिता माघार घेतल्याचे दिसून आले आहे. महावितरणकडे या पंपांकरिता तब्बल २६८ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्या अर्जांची छाणणी करून स्पॉट व्हेरीफिकेशन करून पंप मंजूर करण्यात आले. यातील १८६ शेतकऱ्यांनी आवश्यक अनामत रक्कम भरली. मात्र ८२ शेतकऱ्यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. अश्वशक्तीनुसार अनामत रकमेत फरक शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप तीन प्रकाराच्या अश्वशक्तीचे आहेत. या योजनेत तीन अश्वशक्तीच्या पंपाकरिता २० हजार, पाच अश्वशक्तीच्या पंपाकरिता २७ हजार आणि साडेसात अश्वशक्तीच्या पंपाकरिता ३६ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे. ही रक्कम कमी करावी अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.