शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सेलू शहरालगतच्या शेतीला एकरी एक कोटीचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 18:23 IST

महामार्गामुळे भाव कडाडले: ले-आऊटमधील भूखंड घेणेही आवाक्याबाहेर

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : शहराला लागूनच तुळजापूर- नागपूर महामार्ग व थोड्याच अंतरावरून समृद्धी महामार्ग गेल्याने सेलू शहराच्या वैभवात भर पडली आहे. शहरालगतच्या शेतीचे भाव आकाशाला भिडले असून प्रतिएकरी जवळपास एक कोटी रुपयांचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे येथील शेतीला आणि शेतकऱ्यांनाही 'अच्छे दिन' आलेले दिसून येत आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी ८० ते ८५ लाख रुपये एकरप्रमाणे काही व्यवहारही झालेले आहेत. शहरालगत विकाऊ शेती कमी असल्याने महामार्गालगतच्या शेतीचे भाव चांगलाच भाव खाऊ लागले आहे. सेलू शहराच्या आजूबाजूला सर्व प्रमुख मार्गांनी ले-आऊट टाकण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात कृषक जमीन व कृषक करून प्लॉट विक्री ही सुरू आहे. शहराच्या परिसरात ले-आऊट पडल्याने आता मूळ वस्तीपासून दूरपर्यंत सेलू शहर विस्तारत आहेत.

कोणत्या भागात एकरी काय दर?नागपूर-तुळजापूर मार्गावर : नागपूर-तुळजापूर महामार्गावर शेतीचे भाव चांगले कडाडले आहे. सेलू शहरालगत एक कोटी रुपये प्रतिएकर भाव आहे. थोडे दूर गेले तर ७५ लाखांपर्यंत प्रतिएकर जमीन विकल्या जात आहेत.

सेलू-सुकळी स्टेशन मार्ग : सेलू शहर ते सुकळी स्टेशन मार्गाला क्रॉस करून समृद्धी महामार्गहीँ गेला आहे. या रस्त्याने एमआयडीसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिंगणा, हिंगणी, सेलू मार्गे मदनी असा महामार्ग विकसित झाल्याने या रस्त्यावर एक कोटी रुपये भाव जमिनीला मिळत आहे

सेलू-वडगाव मार्ग : या मार्गावर सेलू शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ले-आऊट विकसित झाले आहे. तसेच सेलू-रेहकी मार्गही चांगलाच भाव खात असून ६० ते ८० लाख रुपये एकर जमीन विकल्या जात आहे. मात्र, प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांची संख्या थोडी कमी आहे. 

व्यावसायिकांत स्पर्धाशहराला लागून समृद्धी माहमार्ग गेला. नागपूर-तुळजापूर महामार्गही विकसित आल्याने जमिनीचे दर वाढले आहेत. आजूबाजूच्या गावांतही जमिनींचे दर वाढले असून ले-आऊट विकसित करून विकणाऱ्यांची स्पर्धा निर्माण झाली आहे.

व्यावसायिकांच्या खिळल्या नजरा... तालुक्यात बोरधरण व बोरव्याघ्र प्रकल्प आहे. तेथे पर्यटकांची गर्दी असते. जंगल सफारीसाठी दूरवरून प पर्यटक येथे येतात. यामुळे हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट वाढले आहेत. व्यावसायिक लोकांच्या नजरा येथील वाढत्या पर्यटनाकडे लागल्याने जमिनीचे दर येथेही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या परिसरात ले-आऊटही वाढले आहेत.

माजी सरपंच काय म्हणतात..."तालुक्यातून समृद्धी महामार्ग, नागपूर-तुळजापूर महामार्ग गेल्याने जमिनी अधिग्रहित केल्या. त्यामुळे या परिसरातील जमिनींना मोठे महत्त्व आल्याने जमिनीचा भाव एक कोटीवर गेला आहे."- जयश्री शंकदवार, माजी सरपंच, धानोली (मेघे).

"तालुका सिंचनात सुजलाम् सुफलाम् आहे. पूर्वीच जमिनीचे दर जास्त होते. तुळजापूर-नागपूर महामार्गाचे नूतनीकरण व समृद्धी महामार्ग गेल्याने भाव आकाशाला भिडले." - पिंटू सोमनाथे, माजी सरपंच

टॅग्स :wardha-acवर्धा