शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता बस करा; आमची मात्र जिरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांनी ‘येरे... येरे... पावसा’ अशी गळ घालत गावागावात धोंडी काढली होती. ‘धोंडी... धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे...’ अशी विनवणी करीत पंगतीही उठविण्यात आल्या. पण, आता गेल्या आठवड्यापासून या पावसाने चांगलाच कहर केल्याने आता ‘जारे... जारे... पावसा’ म्हणण्याची वेळ आली. सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे.जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. अजूनही हवामान खात्याच्या वतीने अतिपावसाची शक्यता वर्तविली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील पाण्याचीही पातळी वाढली असून निम्न वर्धा प्रकल्पाचे ११ दरवाजे ६० सेंमीने तर लाल नाला प्रकल्पाचे २ दरवाजे ५ सेंमीने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिकडे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यात असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अद्यापही आकाशात ढगांची गर्दी कायम असल्याने आता हा पाऊस अनेकांना नकोसा झाला आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेत शिवारातील पाण्यामुळे पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून ओला दुष्काळ जाहीर करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस