शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रात्रंदिन बचावकार्य तरीही, लागू शकतील २, १५ किंवा ३५ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 05:29 IST

नवीन पाइपलाइनने सोडवल्या अनेक समस्या; मजुरांपर्यंत पोहोचतेय अन्न

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांसाठी रात्रंदिन बचावकार्य सुरू आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी तीन वेगवेगळ्या योजनांवर काम सुरू आहे. सहा इंची नवीन पाइपलाइनमुळे मजुरांपर्यंत अन्न पोहाेचवण्यापासून ते त्यांच्याशी संवाद शक्य झाला आहे. असे असले तरी त्यांच्या सुटकेसाठी २, १५ किंवा ३५ दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी माध्यमांशी मंगळवारी संवाद साधला.

सर्वांना वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य : मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला, असे एक्सवरील एका पोस्टमध्ये मुख्यमंत्री धामी म्हणाले. १२ नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्यापासून बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी मोदींनी धामी यांच्याशी चौथ्यांदा संवाद साधला. ‘पंतप्रधानांना एंडोस्कोपिक कॅमेऱ्याद्वारे कामगारांशी झालेल्या संभाषणाची माहिती देण्यात आली. 

या दुर्घटनेनंतर हिमाचलने घेतला धडा   nहिमाचल प्रदेशातील बांधकामाधीन बोगद्यांमध्ये आता सहा इंच जाडीचे पाईप बसविले जाणार आहेत. उत्तराखंडसारखी स्थिती उद्भवल्यास आत ऑक्सिजन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा करता यावा यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे. nठेकेदार कंपन्यांना बोगद्यात दोन अतिरिक्त पाईप्सची व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून त्यांचा वापर आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन आणि अन्नपदार्थ पोहोचवण्यासाठी करता येईल.

ओगर मशीनने ड्रिलिंग सुरूओगर मशीनने पुन्हा ड्रिलिंग सुरू केले आहे. बोगद्यात पुरेसे पाणी, ऑक्सिजन, प्रकाश आहे.  आकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दोन एनडीआरएफ पथके घटनास्थळावर सराव करीत आहेत.

दूरचित्रवाणी वाहिन्यांना सल्लाकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी एक सूचना जारी केली असून त्यांना  सिल्क्यरा येथे बचाव कार्याचे सनसनाटी वृत्तांकन न करण्याचा आणि संवेदनशीलतेने वृत्तांकनाचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :LabourकामगारUttarakhandउत्तराखंड