शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकार यूपीमध्ये १५ लाख झाडे लावणार; प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकार्‍यांची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:57 IST

सेवा पर्वाच्या शुभारंभाच्या दिवशी १७ सप्टेंबरला यूपीच्या ३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक आहे.

लखनौ - येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात उत्तर प्रदेशात सेवा पर्व साजरा केला जाणार आहे. यावेळी देशभरात १.२५ कोटी झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये योगी सरकार उत्तर प्रदेशात १५ लाख झाडे लावणार आहे. सेवा पर्वाच्या शुभारंभाच्या दिवशी १७ सप्टेंबरला राज्यातील ३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक आहे. याशिवाय पर्यावरण संरक्षण जागरूकता अभियान, पावसाळी पाण्याचा योग्य वापर आणि इतर अनेक मोहिमाही राबवल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात प्रभागीय वन अधिकारी यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

जन सहभागाने सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये आयोजन

याबाबत वन पर्यावरण खात्याचे प्रमुख सचिव अनिल कुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशसाठी १५ लाख झाडे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यूपीच्या सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये जनसहभागाच्या माध्यमातून झाडे लावण्याचे आयोजन केले जावे असे निर्देश विभागातील  अधिकाऱ्यांसह सर्व प्रभागीय वन अधिकाऱ्यांना दिले आहेत.  झाडांच्या प्रजातींची निवड पूर्ण करावी, सर्व वृक्षारोपण स्थळांचे फोटो आणि एमआयएस डेटा Meri Life पोर्टलवर अपलोड करावे. जिल्हा वृक्षारोपण समिती इतर विभागांशी समन्वय साधून झाडांचे संरक्षण आणि देखभाल सुनिश्चित करेल असं त्यांनी सांगितले. 

३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक

दरम्यान, सेवा पर्वाच्या शुभारंभाच्या दिवशी १७ सप्टेंबरला यूपीच्या ३४ नगर वन-वाटिकांमध्ये किमान १००-१०० झाडे लावणे बंधनकारक आहे. याशिवाय, वन विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये, वन निगमाच्या सर्व डेपोमध्ये स्वच्छता आणि प्राणी उद्यान तसेच सफारीमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी मोहीम राबवली जाईल. विविध पक्षी अभयारण्यांमध्ये स्वच्छता मोहीम, पर्यावरण संरक्षण जागरूकता, पावसाच्या पाण्यासह जलस्रोतांच्या संरक्षणासाठी जागरूकता मोहिमाही राबवल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात नर्सरी ॲक्शन प्लॅनवर कार्यशाळा होईल. जिल्हास्तरावर विकसित भारत, आत्मनिर्भर भारत यासंदर्भात प्रबुद्ध वर्ग संवादात वन-वन्यजीव संरक्षण, हरीतिमा संवर्धन, जैवविविधता यासारख्या विषयांवर डीएफओ सहभागी होतील. जिल्हास्तरीय मेळावे आणि प्रदर्शनांमध्ये वन विभागाचाही सहभाग असेल. आयोजनासाठी तयारी सुरू आहे असं वृक्षारोपण महाभियान-२०२५ चे मिशन संचालक दीपक कुमार यांनी सांगितले. 

यूपीला मिळाले १५ लाख झाडांचे लक्ष्य

सेवा पर्व अंतर्गत देशभरात १.२५ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये उत्तर प्रदेशला १५ लाख झाडांचे लक्ष्य देण्यात आले आहे.

सर्वाधिक लक्ष्य असलेली १० राज्ये

ओडिशा: २० लाखउत्तर प्रदेश: १५ लाखआसाम: ११.५० लाखगुजरात: ११ लाखछत्तीसगड: ११ लाखमध्य प्रदेश: ८ लाखमहाराष्ट्र: ७ लाखआंध्र प्रदेश: ७ लाखराजस्थान: ७ लाखबिहार: ५ लाख

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ