शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

विश्वविक्रमी दीपोत्सव....! २२ लाख दिव्यांनी उजळली अयोध्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 07:10 IST

लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला. 

अयोध्या : अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी घाट परिसरात ‘राम की पौडी’ येथे शनिवारी २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला. 

‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या मते एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने दिव्यांच्या रोषणाईचा हा विश्वविक्रम आहे. ड्रोनच्या साहाय्याने या दिव्यांची गणना करण्यात आली. मागच्या वर्षी अयोध्येत १५.७६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. 

यापूर्वी प्रतीकात्मक भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर पुष्पक विमानाने अयोध्येत पोहोचले. येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.  

जगातील १०० हून अधिक देशांमध्ये या दीपोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्रीच्या ‘लाइट ॲण्ड साऊंड’ कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.  दिवाळीनिमित्त येथे शनिवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत राम कथा उद्यानात पोहाेचली. (वृत्तसंस्था)

कधी करावी पूजा?

रविवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन आहे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करावे. तसेच याच दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी ६ ते रात्री ८:३३ यावेळेत लक्ष्मी-कुबेर पूजन करावे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.

 

 

 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Ayodhyaअयोध्या