शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:11 IST

२० ते २३ जानेवारीपर्यंत ॲडव्हान्स बुकिंग करू नका; लखनौच्या मोठ्या हॉटेल्सना सूचना

- राजेंद्र कुमारलोकमत न्यूज नेटवर्कलखनौ : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जसजसा जवळ येत आहे, तसतशी उत्तर प्रदेश सरकारसमोरील व्यवस्थेची आव्हाने वाढत आहेत. श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होणाऱ्या देशभरातून येणाऱ्या अतिथींना कुठे ठेवायचे, हे सध्या सरकारसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे.

  लाखो लोक २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होऊ इच्छित आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने यासाठी ८ हजार अतिविशिष्ट मान्यवरांना आमंत्रित केले आहे. त्यांना अयोध्येत राहण्याची जागा कमी पडत आहे. याचमुळे या अतिथींमधील शेकडो पाहुण्यांची लखनौत राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या हॉटेल्समध्ये २० ते २३ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची ॲडव्हान्स बुकिंग करू नये, असे सांगण्यात आले आहे.

व्यवस्थेसाठी प्रशासनाची कसरतnश्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी येणाऱ्या अति विशिष्ट अतिथींच्या राहण्याची व्यवस्था कोठे करावी, एवढीच समस्या सरकारपुढे नाही. त्यांची सुरक्षा, वाहनांच्या पार्किंगबाबतची तयारी सुरू आहे.n२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत असणार आहेत.nकोठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये. त्या कालावधीत अयोध्येत दाखल होणाऱ्या लोकांनी मंदिराकडे जाण्याने अडचणी निर्माण होऊ नये, याचेही नियोजन केले जात आहे.nयासाठी कोणत्या ठिकाणी किती पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, हेही ठरवले जात आहे. याशिवाय देशभरातून अयोध्येत दाखल होणाऱ्या ५०० पेक्षा अधिक साधू-संतांच्या थांबण्याची व्यवस्था केली जात आहे.nपंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या थांबण्याची व सुरक्षेची व्यवस्था करण्यात राज्याचे अधिकारी, एसपीजीचे अधिकारी सध्या गुंतले आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर