शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 07:08 IST

गर्भगृहात विराजमान करण्यासाठी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगिराज यांनी साकार केलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची झाली निवड

अयोध्या : येथील नवीन भव्य प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत असताना त्याच्या आधीच्या विधींना १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. सहा दिवसांच्या या सोहळ्यात विविध प्रकारच्या पूजाअर्चांचा समावेश असेल.

संपूर्ण सोहळ्यात छोटीशीदेखील चूक झाली तर तिचे कोणतेही परिणाम होऊ नयेत, यासाठीच्या प्रायश्चित्त पूजेने विधीला सुरुवात होईल ती १६ जानेवारीला. सध्या तात्पुरत्या मंदिरात विराजमान रामलल्ला व अन्य मूर्तींना मिरवणुकीने आणि मंत्रोच्चारात १७ जानेवारीला नवीन मंदिर परिसरात आणले जाईल. पवित्र नद्यांच्या जलाचा मूर्तींना अभिषेक, अष्टगंध, केशर, विविध प्रकारची अत्तरे, दूध, पंचगव्याचा अभिषेक केला जाईल. 

शर्कराधिवास या विधीमध्ये मूर्तींना साखरेत ठेवले जाते आणि साखरयुक्त जलाने अभिषेक केला जातो. फलाधिवासामध्ये मूर्ती फळांमध्ये ठेवणे, त्यासाठीची पूजा केली जाते. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी संपूर्ण सोहळ्याची माहिती सोमवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. 

असे आहे वेळापत्रक१६ जानेवारी :  प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन१७ जानेवारी : रामलल्ला मूर्तीचा मंदिर परिसरात प्रवेश१८ जानेवारी (सायंकाळी) : तीर्थपूजन आणि जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास१९ जानेवारी (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास. सायंकाळी : धान्याधिवास२० जानेवारी (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास. सायंकाळी - पुष्पाधिवास२१ जानेवारी (सकाळी) : मध्याधिवास. सायंकाळी - शय्याधिवास२२ जानेवारी : प्राणप्रतिष्ठा सोहळा

कशी झाली मूर्तीची निवड?गर्भगृहात शिल्पकार अरुण योगिराज यांनी बनविलेली रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे, अशी घोषणाही चंपत राय यांनी केली. मात्र, त्या रामलल्लाच्या मूर्तीचे छायाचित्र अद्याप जारी करण्यात आलेले नाही. म्हैसूरचे शिल्पकार योगिराज यांनी बनविलेल्या राममूर्तीची या मंदिरासाठी निवड करण्यात आली आहे, अशा बातम्या याआधीच प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. त्यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी योगिराज यांचे अभिनंदनही केले होते. मात्र, त्यानंतर ट्रस्टकडून असे सांगण्यात आले की, अरुण योगिराज, गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे या तीन मूर्तिकारांकडून रामलल्लाच्या तीन मूर्ती बनवून घेण्यात आल्या आहेत. त्यातील कोणती मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान करावी, याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या विषयाची चर्चा काही काळ थांबली होती. 

सध्याची मूर्तीही ठेवणार गर्भगृहातरामलल्लाची मूर्ती येत्या १८ जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होईल. रामजन्मभूमीवर सध्या पुजली जात असलेली रामलल्लाची मूर्तीही गर्भगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या