शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या, राम मंदिराचे उद्घाटन कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 18:02 IST

Ram Mandir : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवणार आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. वेळोवेळी राम मंदिराचे फोटोही समोर येत आहेत. दरम्यान, जानेवारी 2024 पर्यंत राम मंदिराचा तळमजला तयार होईल आणि 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर राम मंदिराचे उद्घाटन होईल. तसेच, रामललाची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा केली जाईल. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवणार आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 14 ते 26 जानेवारी 2024 दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिराचे उद्घाटन होऊ शकते. त्यामुळे अनेक वर्षांची भाविकांची प्रतीक्षा संपणार आहे.दुसरीकडे, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललाच्या दोन अतिरिक्त मूर्ती मंदिर परिसरातच चांगल्या ठिकाणी स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांचे पावित्र्य अबाधित राहील. अयोध्येत कोरलेल्या रामललाच्या तीन मूर्तींपैकी केवळ सर्वोत्तम मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात येणार आहे. 

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट रामललाच्या उर्वरित दोन मूर्ती स्थापित करण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी विविध पुजाऱ्यांचा सल्ला घेत आहे. ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, रामललाच्या उर्वरित दोन मूर्ती मंदिराबाहेर पाठवल्या जाणार नाहीत. त्या मंदिर परिसरात चांगल्या ठिकाणी पूर्ण सन्मानाने स्थापित केल्या जातील. ट्रस्टच्या सदस्याच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी एक मूर्ती स्थापित केली जाऊ शकते. राम मंदिराचा पहिला आणि दुसरा मजलाही तितकाच भव्य असेल. रामललाच्या उर्वरित दोन मूर्तींसाठी ते योग्य ठिकाण असू शकते, असे सदस्य म्हणाले.

अयोध्येचा बदलणारा चेहरायाशिवाय, अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबरोबरच अयोध्येत संपूर्ण कायापालट करण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. एकीकडे जुन्या अयोध्येच्या नूतनीकरणासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे अयोध्येत घनकचरा व्यवस्थापन, द्रव कचरा व्यवस्थापन आणि बहुस्तरीय पार्किंगवरही काम सुरू आहे. एवढ्या जुन्या शहराच्या पुनर्बांधणीची योजना अयोध्या कधीच राबवली गेली नाही. मात्र अयोध्येचे चित्र बदलण्याची कसरत राम मंदिर उभारणीच्या आदेशानंतरच सुरू झाली आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, द्रव कचरा व्यवस्थापनावर महापालिकेचा पूर्ण भर आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी