शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत असणार नाहीत लालकृष्ण आडवाणी, यामुळे ऐन वेळी बदलावा लागला कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 09:34 IST

संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांना घरी जाऊन राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.

भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आज (22 जानेवारी) रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येत असणार नाहीत. ते दिल्ली येथील आपल्या निवासस्थानीच या भव्य समारंभाचा आनंद घेतील. थंड आणि खराब हवामान असल्याने त्यांनी अयोध्या दौरा रंद्द केला आहे.  आडवाणी 96 वर्षांचे आहेत. यामुळे त्यांची प्रकृती लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांना घरी जाऊन राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. यावेळी अडवाणी म्हणाले होते, एवढ्या मोठ्या सोहळ्याला प्रत्यक्षपणे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण, श्रीरामांचे मंदिर हा केवळ पूजेच्या दृष्टीने आपले आराध्य म्हणून त्यांचे मंदिर, असा प्रसंग नही. तर या देशाची पवित्रता आणि या देशाच्या मर्यादेची स्थापना पक्की होण्याचा प्रसंग आहे.

'काय म्हणाले होते आडवाणी' - आडवाणी म्हणाले होते, एक म्हणजे, एवढ्या वर्षांनंतर, भारताच्या ‘स्व’ च्या प्रतिचे पुनर्निर्माण आम्ही केले. हे आम्ही पुरुषार्थाच्या आधारावर केले. दुसरे म्हणजे, आपली एक दिशा असायला हवी, ती पकडण्याचा प्रयत्नही आपण अनेक दशकांपासून करत होतो. ती आपल्याला मिळाली आहे आणि स्तापन झाली आहे. एक विश्वास सर्वांच्या मनात स्थापित झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे वातावरण मंगलमय झाले आहे आणि अशा वेळी आपण प्रत्यक्षपणे तेथे उपस्थित राहून तो प्रसंग पाहू. हे नक्कीच एखाद्या जन्मीचे पुण्य असेल. त्याचेच फळ आम्हाला मिळत आहे. यासीठी मी आपले कृज्ञपणे आभार मानतो. ही तर मागूनही न मिळणारी संधी आहे. तो मिळाला आहे. नक्की उपस्थित असेन...कसं आहे अयोध्येतील हवामान? -अयोध्येत सकाळी 6 वाजता 8°C तापमाण नोंदवले गेले. पुढील काही तासांमध्ये तापमान आणि दृश्यमानतेत किंचित घट अपेक्षित आहे. यानंतर, पुन्हा सुधारणा होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज किमान तापमान 7 आणि कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहील. 

 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर