शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

अयोध्येतील राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, विशेष कॅफेटेरिया विकसित केला जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:43 IST

अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया  (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत. 

जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. राम मंदिराचे सुमारे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. तसेच, पुढील वर्षी १६ ते २४ जानेवारी दरम्यान अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. दरम्यान, आता अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया  (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत. 

मंदिराच्या सभोवतालचा परिसर ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रतिकांनी सुशोभित केला जाईल आणि जन्मभूमी मार्ग व भक्ती मार्गावरील जवळच्या घरांच्या छतावर विशेष कॅफेटेरिया विकसित केले जाईल, असे अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, अयोध्या प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'अयोध्या विकास प्राधिकरण (ADA) इच्छुक घरमालकांना त्यांच्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि एजन्सींसोबत कराराच्या माध्यमातून छतावरील कॅफेटेरिया बांधण्यासाठी प्रोत्साहित करेल.' 

प्रसारमाध्यमांशी बोलताना विभागीय आयुक्त गौरव दयाल म्हणाले, 'एडीएच्या पॅनेलद्वारे आवश्यक परवानग्या आणि संबंधित प्रक्रिया सुलभ केल्या जातील. अयोध्येत येणार्‍या भाविकांना रामजन्मभूमीच्या आजूबाजूच्या घरांच्या छतावर बनवलेल्या कॅफेटेरिया किंवा ओपन एअर रेस्टॉरंटमधून श्री राम मंदिराचे मनमोहक दृश्य पाहता येणार आहे. तसेच, भगवान रामांच्या भव्य मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्येला पौराणिक वैभवानुसार सजवण्यात येत आहे. यासोबतच अयोध्येत विविध विकासात्मक उपक्रम राबवले जात आहेत, असे गौरव दयाल यांनी सांगितले.

मंदिराचे सुमारे ७० टक्के बांधकाम पूर्णअयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनाची वेळ जवळ येत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे सुमारे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे निवेदन आले आहे. तसेच, या वर्षी डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्टने कामगार आणि तंत्रज्ञांची संख्या वाढवली आहे. आता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चोवीस तास बांधकाम सुरू आहे. पुढील वर्षी १६ ते २४ जानेवारी दरम्यान अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तसेच, पुढील वर्षी जानेवारीत हे मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या