शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येचा कायापालट, विमानतळ पूर्णत्वाकडे; रेल्वे स्थानकाची इमारत सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 05:31 IST

रेल्वे स्थानकाची इमारत सज्ज; कोट्यवधी खर्चून ४ नवीन रस्त्यांचे काम सुरू

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर जसजसे पूर्णत्वाकडे येत आहे, तसे शहराने कात टाकून एक वेगळेच रूप धारण केले आहे. सगळीकडे विकासकामे प्रचंड वेगाने पूर्ण होत असताना विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे स्थानकाची नवीन इमारतही सज्ज आहे. 

राम मंदिराजवळ ९६३ कोटी रुपये खर्चून चार महत्त्वाचे रस्ते बांधले जात आहेत. ५०० मीटर जन्मभूमी मार्गाचा खर्च ३९ कोटी, ७५० मीटर भक्ती पथासाठी ६२ कोटी, २ किमी धर्मपथासाठी ६५ कोटी आणि १३ किमी राम मार्गासाठी ७९७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे सर्व मार्ग २३ डिसेंबरपर्यंत बांधले जातील. तसेच महामार्गांवर बायपासच्या दिशेने भव्य दरवाजे बांधले जात आहेत. 

विमानतळाची इमारत अपूर्णn ११७५ कोटी रुपये खर्चून बायपासजवळ मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. n इमारतदेखील ६९ टक्के तयार आहे. ऑक्टोबरअखेर ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. डिसेंबरपर्यंत अयोध्या विमानतळावरून उड्डाणे सुरू होऊ शकतात.

१० हजार चौरस मीटरचे विशाल रेल्वे स्थानक२४१ कोटी रुपये खर्चून सुमारे १० हजार चौरस मीटरमध्ये बांधलेली अयोध्या जंक्शनची नवीन इमारत २२४ खोल्या-आरामगृह, १,५०० प्रवाशांच्या क्षमतेच्या ६ लिफ्ट, सरकते जिने, फूड प्लाझा आणि २५ डब्यांच्या ३ प्लॅटफॉर्मसह उद्घाटनासाठी सज्ज आहे. आता केवळ फलाटाच्या बाजूचे काही काम बाकी असून, ते एक ते दोन महिन्यांत पूर्ण होईल.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याAirportविमानतळRam Mandirराम मंदिर