शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 20:45 IST

राम जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसोबतच इतर तयारीही वेगाने सुरू आहे.

Ayodhya Ram Mandir: राम जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसोबतच अन्य तयारीही जोरात सुरू आहे. राम मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे. आता मंदिराच्या उद्घाटनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, 15 ते 24 जानेवारी दरम्यान अयोध्येत विधी पार पडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला येतील आणि याच दिवशी श्रीरामाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल.

दरम्यान, अयोध्येत सुरू असलेल्या विहिंपच्या केंद्रीय आणि प्रादेशिक मंत्र्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. श्री रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम भव्य-दिव्य केला जाणार आहे. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार म्हणाले की, प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक रामभक्ताचा कार्यक्रम असेल. केवळ देशातीलच नाही तर परदेशात राहणारे लोकही या महामहोत्सवात सहभागी होणार आहेत.

देशभरातील सर्व मंदिरांमध्ये पूजा होणार आहेप्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील मठ आणि मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ, हवन आणि आरती होतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच राम भक्त त्या रात्री आपल्या घरात पाच दिवे नक्कीच लावतील. देश आणि सनातन यांना जोडणारी तारीख म्हणून श्री राम मंदिराच्या उभारणीची तारीख सदैव स्मरणात राहील, असेही ते म्हणाले.

24 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले होणार ?श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट पंतप्रधान मोदींना अभिषेक सोहळ्यासाठी औपचारिकपणे आमंत्रित करेल. मंदिर ट्रस्टने 14 जानेवारीला मकर संक्रांतीनंतर राम लल्लाच्या अभिषेकाची प्रक्रिया सुरू करण्याचा आणि राम लल्लाच्या 'प्राण प्रतिष्ठा' (अभिषेक) चा 10 दिवसांचा विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे सदस्य नृपेंद्र मिश्रा यांनी जूनमध्ये सांगितले होते की, राम मंदिर 24 जानेवारीला राम लालाच्या मूर्तीच्या अभिषेकनंतर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी