शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:37 IST

Ayodhya Deepotsav 2024: या कार्यक्रमांतर्गत शरयू नदीच्या 55 ​​घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

Ayodhya Deepotsav 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदाही अयोध्येचा आठवा दीपोत्सव भव्य-दिव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने शरयू नदीच्या 55 घाटांवर 28 लाख दिवे प्रज्वलित करून नवा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू आहे. दीपोत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाने दिवे आणि स्वयंसेवकांची संख्या निश्चित केली आहे, जेणेकरून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध काम मोठ्या प्रमाणावर करता येईल.

या कार्यक्रमांतर्गत शरयू नदीच्या 55 ​​घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. घाट संयोजकांच्या देखरेखीखाली राम की पायडी, चौधरी चरणसिंग घाट आणि भजन संध्या स्थळासह इतर सर्व घाटांवर दिवे लावले जातील. याशिवाय 14 संलग्न महाविद्यालये, 37 मध्यवर्ती महाविद्यालये आणि 40 स्वयंसेवी संस्थांमधील सुमारे 30,000 स्वयंसेवक या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार आहेत. घाटांवर दिव्यांची संख्या आणि स्वयंसेवकांचे वाटप आधीच ठरलेले आहे.

घाटांवर दिवे आणि स्वयंसेवकांची संख्याअवध विद्यापीठाने घाटांवर लावले जाणारे दिवे आणि तैनात करण्यात येणाऱ्या स्वयंसेवकांची सविस्तर आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे. उदाहरणार्थ, राम की पैडीच्या घाट 1 वर 65,000 दिवे लावण्यासाठी 765 स्वयंसेवक तैनात केले जातील, तर 447 स्वयंसेवक घाट 2 वर 38,000 दिवे लावण्यासाठी जबाबदार असतील. तसेच घाट क्रमांक 3 मध्ये 48 हजार दिव्यांच्या कामासाठी 565 स्वयंसेवक तर 61 हजार दिव्यांच्या कामासाठी 718 स्वयंसेवक घाट 4 येथे तैनात करण्यात येणार आहेत. 

स्वयंसेवकांचा सहभाग आणि आयकार्ड वितरणदीपोत्सवाचे नोडल अधिकारी प्रा. संत शरण मिश्रा म्हणाले की, 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 24 ऑक्टोबरपासून दिव्यांची खेप घाटांवर येण्यास सुरुवात झाली असून, घाटांवर दिवे लावण्याचे काम 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्वयंसेवकांच्या आय-कार्डचे वितरणही सुरू झाले असून, त्यापैकी 15 हजारांहून अधिक आय-कार्ड संस्थांच्या अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत सर्व संस्थांना आय-कार्ड उपलब्ध करून दिले जातील.

विश्वविक्रम होणारशरयू नदीच्या 55 घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे अयोध्येत विश्वविक्रम होईल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याDiwaliदिवाळी 2024