शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रामललांच्या मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन, चांदीच्या मूर्तीची मंदिर प्रदक्षिणा; शरयू नदीतीरावर पार पडला कलशपूजन सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 07:39 IST

दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. 

अयोध्या : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामललांची बहुप्रतीक्षित मूर्ती बुधवारी मंदिर परिसरात दाखल झाली. नियोजनानुसार मूर्तीची परिसरात प्रदक्षिणा होणार होती, मात्र तिचे वजन अधिक असल्याने त्याऐवजी १० किलो चांदीच्या मूर्तीची प्रदक्षिणा घालण्यात आली. तत्पूर्वी, सकाळी शरयू नदीतीरावर कलशपूजन झाल्यावर कलश राम मंदिरामध्ये नेण्यात आले. दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. 

आज तीर्थपूजन, जलयात्रा, जलाधिवास विधीप्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी होणाऱ्या विधींच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी तीर्थ पूजन, जलयात्रा, जलाधिवास, गंधाधिवास हे विधी पार पडणार आहे. त्यानंतर शुक्रवारी औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी होणार आहेत.

पंतप्रधान हेच मुख्य यजमानरामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मुख्य यजमान असतील, अशी माहिती मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दिली. तसेच त्यांनी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा व त्यांची पत्नी हे मुख्य यजमान असल्याचा वृत्त फेटाळले. परंतु ते मुख्य सोहळ्यावेळी ते उपस्थित असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या