शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२५,००० जवान, स्नायपर अन् कडक बंदोबस्त; अयोध्येत सुरक्षेसाठी AI चीही मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 16:59 IST

रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे.

नवी दिल्ली - देशभरात २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना केलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात त्याच दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन अयोध्येच्या राम मंदिराचं लोकार्पण होईल. देशभरातून भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. तर, पंतप्रधानांसह अनेक मंत्री, मुख्यमंत्री, सेलिब्रिटी, उद्योगपती आणि दिग्गज मान्यवरांची मांदियाळीच या सोहळ्याला जमणार आहे. त्यादृष्टीने सरकारकडून कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी, स्नायपर ते एनएसजी कमांडोही तैनात आहेत.

रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे. मंदिराचे उर्वरीत बांधकाम आणि सजावटीकडे प्रधान्यक्रमाने पाहिलं जात असून संपूर्ण अयोध्या नगरी उजळून निघत आहे. तर, दुसरीकडे सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर असून कडक बंदोबस्त तैनात केला जात आहे. अयोध्येला सुरक्षेच्या कारणास्तव काही झोनमध्ये विभागलं जात आहे. रेड आणि यलो झोन करण्यात आले असून ड्रोनच्या देखरेखीखाली अयोध्या नगरी असणार आहे. येथील पोलिसांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या डेटाबेसवर काम करणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत संपर्क केला आहे. त्या माध्यमातून येथील सुरक्षा अधिक मजबूत आणि सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

राम मंदिर सुरक्षेची जबाबदारी युपी एसटीएफसह केंद्रीय सुरक्षा दलांकडे देण्यात आली आहे. अयोध्या नगरीला रेड आणि यलो झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. ६ कंपनी सीआरपीएफ, ३ कंपनी पीएसी, ९ कंपनी एसएसएफ, ३०० पोलीस कर्मचारी, ४७ जवान फायर सर्व्हीस, ३८ जवान, ३८ जवान एल आय यू, ४० जवान रेडिओ पुलिस, दोन बॉम्ब शोधक पथके, एक कमांडो युनिट पीएसी, एक युनिट एसटीएफ, तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांसह एनएसजी कमांडोही तैनात असणार आहेत. श्रीराम जन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तब्बल २५००० जवान अयोध्येत असणार आहेत. त्यामध्ये, भारतीय सैन्य दलाचे जवानही असतील.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरIndian Armyभारतीय जवान