शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एकही पैसा नसलेल्या बँकेत तब्बल २० हजार कोटींचे ‘धन’; जगभरात आहेत १५० शाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 06:20 IST

या बँकेच्या नावावर आतापर्यंत २० हजार कोटींचे धन जमा झाले आहे. आश्चर्य वाटेल. पण, अशी बँक प्रभू श्री रामाच्या अयोध्या नगरीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्याMarathi News ): या बँकेत एकही पैसा नाही, इथे कोणालाही कर्ज दिले जात नाही, कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाहीत, तरीही या बँकेच्या नावावर आतापर्यंत २० हजार कोटींचे धन जमा झाले आहे. आश्चर्य वाटेल. पण, अशी बँक प्रभू श्री रामाच्या अयोध्या नगरीत आहे. आंतरराष्ट्रीय सीताराम नाम बँक असे तिचे नाव आहे. 

जगभरातील लाखो भक्त १९७० पासून या बँकेत राम राम, जय श्रीराम, जय सिया राम असे लिहून वह्या जमा करतात. जगभर बँकेच्या १५० शाखांमध्येही भक्तांनी त्यांच्या हाताने रामनाम लिहिलेल्या वह्या जमा होतात. अनेक रामभक्त टपालाने या बँकेत राम नामाची ही अनोखी पुंजी जमा करतात. 

वाल्मिकी रामायणम भवनात ही बँक आहे. या संस्थेचे प्रमुख आणि श्री राम मंदिराच्या आंदोलनात व उभारणीत मोलाचे योगदान देणारे महंत श्री नृत्य गोपाल दास महाराज यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर १९७० रोजी ही बँक सुरू झाली आणि रामभक्तीत लीन होत लाखो - करोडो भक्तांनी आपल्या हस्ताक्षराने रामनाम गिरवत ते श्रद्धाधन या बँकेत जमा केले. ८२ वर्षांचे पुनित रामदासजी महाराज हे या बँकेचे व्यवस्थापक आहेत. 

तीस भाषांमधून राम नाम संग्रह

आजमितीस उर्दू, इंग्रजीसह जवळपास तीस भाषांमधून राम नाम संग्रह पाठविणारे भक्त आहेत. ज्या भक्तांनी पाच लाख किंवा त्यापेक्षा अधिक राम नाम लिहिले आहे, त्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाते आणि त्यात राम नामाची संख्या लिहिली जाते. एरव्ही बँकांमध्ये ज्याप्रमाणे हिशेब लिहिले जातात तसे या बँकेत रामनामाची भाषावार नोंद केली जाते.

जेव्हा तुम्ही राम नाम लिहिता तेव्हा...

स्वत: बँकेमार्फत रामनाम लिहिण्यासाठी दोन लाख वह्यांचे मोफत वाटप दरवर्षी केले जाते. याशिवाय अनेक धार्मिक संस्था, व्यक्ती असे मोफत वाटप करत असतात. जेव्हा तुम्ही राम नाम लिहिता तेव्हा आपोआप त्याचा उच्चार तुमच्याकडून होतो. राम नामामध्ये अद्भूत शक्ती आहे आणि ती जगभर यानिमित्ताने पसरावी, त्यानिमित्ताने आस्तिकता समाजात वृद्धिंगत व्हावी, हा  उद्देश असल्याचे ते म्हणाले. 

आमच्या बँकेत आतापर्यंत २० हजार कोटी रामनाम जमा झाले आहेत. एवढे धन ठेवायचे कुठे, हा प्रश्न असतो. मग, दरवर्षी जन्माष्टमीच्या आधी आम्ही त्यातील काही संग्रह शरयु नदीला विधिवत अर्पण करतो. -  पुनित रामदासजी महाराज, व्यवस्थापक, आंतरराष्ट्रीय सीताराम नाम बँक

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर