शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

टायलर, एमिली आणि गाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:28 IST

टायलरनं डिझाइन केलेला गाऊन आता इलिनॉईस राज्यातल्या सगळ्या आजारी मुलांच्या अंगावर असणार आहे.  

ठळक मुद्देया स्पर्धेबद्दल कळताच टायलरला त्यात भाग घ्यावासा वाटला.

टायलर केपकॉस्कस नावाचा  सात वर्षाचा अमेरिकन मुलगा.  त्याची चार वर्षाची एमिली नावाची छोटी बहिण आहे. दोघं सतत एकमेकांसोबत खेळतात. त्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. एमिलीला हदयासंबंधीचा आजार आहे. जन्मल्यापासून आतार्पयत तिची तीन ऑपरेशन्स झाली आहेत.  प्रत्येकवेळेस एमिलीला दवाखान्यात अॅडमिट केलं की, ती परत नीट होऊन घरी येईलना याची तिच्या आई बाबांना काळजीच वाटते. पण टायलर मात्र लहान असूनही समजूतदारपणो वागतो. तो  एमिलीला दवाखान्यात जाण्याआधी तो शूर आहेस, तू बरी होशील .आमचं तुङयावर खूप प्रेम आहे असं समजावून सांगतो. टायलरला हे माहित त असतं की, आपली बहिण फायटर आहे, ती आजारावर मात करून घरी येईलच. 

एकदा टायलरच्या आईला  ‘स्टारलाइट चिल्ड्रन्स फाऊण्डेशन’च्या फेसबुक पेजवर एका स्पर्धेची माहिती मिळाली. हे फाऊण्डेशन आजारी मुलांसाठी काम करतं. दवाखान्यात उपचारांसाठी अॅडमिट होणा :या मुलांसाठी गाऊनचं डिझाईन तयार करण्याची  स्पर्धा होती.  या स्पर्धेबद्दल कळताच टायलरला त्यात भाग घ्यावासा वाटला. एमिलीमुळे त्याचंही सतत दवाखान्यात येणं जाणं असतं. त्यानं एमिलीचा विचार डोक्यात ठेवून त्यानं डिझाईन केलं.  गाऊनवर ब्रेव्ह, करेज, होप, सव्हार्यव्हर, स्ट्रेन्थ, लव, फायटर हे शब्द आणि विविध रंग  त्याच्या या गाऊनच्या डिझाइनमधे होते. दवाखान्यात असताना एमिलीनं जर हा गाऊन घातला तर हे शब्द आणि रंग बघून तिला आपली नक्की आठवण होईल, म्हणून टायलरनं तो गाऊन तसा डिझाइन केला. हे डिझाइन त्यानं स्टारलाइटला पाठवलं. तिथे 1000 डिझाइन आलेले होते. त्यातून टायलरच्या डिझाईनला बक्षिस मिळालं. आता जेव्हा एमिली दवाखान्यात अॅडमिट होईल तेव्हा तिच्या अंगावर आपण डिझाइन केलेला गाऊन असेल या विचारानं टायलर खूष झाला आहे. टायलरनं डिझाइन केलेला गाऊन आता इलिनॉईस राज्यातल्या सगळ्या आजारी मुलांच्या अंगावर असणार आहे.  

 

.