शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मुलांचा अभ्यास हा ऑफलाईनच असावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 16:36 IST

‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग

ठळक मुद्देलॉकडाऊन पालकसभा

- आनंद निकेतन, नाशिक.    सध्याची कोविड 19 ची परिस्थिती व त्यात लहान मुलांची शाळा किंवा शिक्षण कसं घ्याव?- यावर सगळीकडे जोरदार चचा आहेत. आनंदनिकेतन शाळेतील शिक्षकांना ऑनलाईनपेक्षा शाळा ऑफलाईनच असावी असं वाटत होतं, त्यामुळे बराच विचार विनिमय करून असं ठरवलं,  की पहिल्या महिन्यासाठी मुलांनाघरी करण्यासाठी काही तरी काम देऊ,  वर्कशीट्स स्वरूपात!  या वर्कशीट्स उजळणी स्वरूपाच्या असतील. पहिली,  दुसरीला पालकांना घरी काय काय करून घेता येईल, कसं घेता येईल याची यादी तयार केली. सगळ्या वर्कशीटस तारखेप्रमाणो असतील, म्हणजे मुलांवर जास्त अभ्यासाचा ताण येणार नाही याची काळजी घेतली. या अभ्यासाला पूरक अशा गोष्टी (व्हिडिओज, काही सूचना)   पालकांच्या गटात नियमित पोस्ट करायचं ठरलं. हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यासाठी क्राफ्ट पेपर,  वस्तू तयार करण्याच्या सूचना! असं एक कीट तयार केलं. हे कीट मुलांपयर्ंत पोचवण्यासाठी आम्ही पालक -भेट घेण्याचं ठरवलं.

प्रत्यक्ष पालकभेटींमागे आणखीही एक महत्त्वाचं कारण होतं. आमच्या पालकांपैकी जवळजवळ 60} पालक हे अल्पउत्त्पन्न गटातील आहेत. लॉकडाऊनमुळे काही पालकांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. आधीची नोकरी गेल्यामुळे काहींना नवीन नोकरी शोधावी लागली. अशा पालकांशी आपण वैयक्तिक बोलावं सर्वांसमक्ष ते मोकळेपणाने बोलू शकणार नाहीत म्हणून प्रत्यक्ष बोलून त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात असंही मनात होतं. यावर्षी फी वाढ न करून आम्ही त्यांना थोडा दिलासा दिलाच होता. मात्र या संकटाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत हे ही त्यांना सांगायचं होतं.रोज एका इयत्तेच्या पालकांना दहा दहाच्या गटात वेळ देऊन बोलवावं असं ठरलं. पालकसभेला दोन्ही पालकांनी (आई- बाबा) यावं, यासाठी आम्ही आग्रही असतो, पण यावेळी मात्र एकाच पालकाने यावे,  अशी सूचना दिली, मास्क लावून यावे, मुलांना आणू नये अशाही सूचना अर्थातच होत्या. नियोजनाप्रमाणो दिनांक 15जून ते 18जून या कालावधीत एकेका इयत्तेची पालकसभा पार पडली.या सांगितलेल्याप्रमाण ेगटाला दिलेल्या वेळेनुसार पालक हजर राहिले.पालक भेटीला प्रत्येक इयत्तेच्या सर्व पालकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ऑफलाईन अभ्यासाबद्दल शाळेचं आणि पालकांचं एकमत झालं. पावसाळा संपेपयर्ंत म्हणजे सप्टेंबरपयर्ंत शाळा सुरू करू नये असं बहुतांश पालकांचे मत होतं. त्यामुळ ेघरीच अभ्यास द्यावा आणि तोही ऑफलाईन जास्त आणि गरज असेल तिथे ऑनलाईन.ठरल्याप्रमाणो रोज दोन विषयांचा कृती / उपक्रम / वर्कशीट या स्वरुपात अभ्यास दिला. अभ्यासाच्या विषयांबरोबरच चित्रकला, कायार्नुभव यातही काय करायचं हे दिलं. हा अभ्यास कसा घ्यायचा ? पालकांनी किती मदत करायची? यावर चर्चा झाली. याच पद्धतीने पुढे काही दिवस अभ्यास व कृती करायला दिल ेतर पालक व मुलांना आवडणार आहे,असेही पालक म्हणाले. एरवीच्या पालकसभांना उपस्थिती कमी असली, तरी या पालकसभांना सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करून जवळजवळ शंभरटक्के उपस्थिती होती. मुलांना शाळेत येण्याची आणि ताईंशी प्रत्यक्ष बोलण्याची खूप ओढ लागली आह ेअसंही पालकांनी आठवणीने सांगितलं, त्यामुळे मुलं आणि ताईंचा एकमेकांशी संवाद व्हावा यासाठी एखादी ऑनलाईन मीटिंग बोलावूया असं आता आम्ही ठरवतो आहोत.