शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

कबुतराला कॉपी करून करा हा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 1:02 PM

पिजन लंज.

ठळक मुद्देया पद्धतीनं थोडं जास्त वेळ बसण्याचा सराव केल्यास बरीच दुखणी कमी होतील.

कबुतर हा आपल्या सर्वाच्या अतिशय परिचयाचा पक्षी. अनेक ठिकाणी आपल्याला तो दिसतो. या पक्ष्याला अनेक जण पाळतातही.पण ब:याचदा या पक्ष्यांचे पंख कापलेले असतात. पूर्ण नाही, पण काही प्रमाणात. त्यामुळे त्यांना फार लांब उडून जाता येत नाही. पण असं करू नये. पक्ष्यांना पिंज:यात कोंडून ठेवणं, त्यांचे पंख कापणं. हे अतिशय क्रूरपणाचं आहे. कबुतरांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कोणी त्यांना कबुतर म्हणतं, कोणी त्यांना पारवा, तर कोणी होला. उष्ण प्रदेशांत हे पक्षी सामान्यत: जास्त प्रमाणात आढळून येतात.  त्यांचा गुटुरगुंùù गुटुरगुंùù असा  खर्जातून काढलेला आवाज आपल्याला नेहेमीच आकर्षून घेतो. याच पक्ष्याचा व्यायाम आज आपल्याला करून पाहायचा आहे. वेगवेगळ्या तीन-चार पद्धतीनं हा व्यायाम करता येतो. त्यातील सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत. म्हणायला सोपी असली, तरी ती तितकीशी सोपी नाही, हेही लक्षात घ्या.योगाच्या आसनांतही यांचा समावेश केलेला असतो.आपल्या आजच्या या व्यायामाचं नाव आहे, ‘पिजन लंज’.

कसा कराल हा व्यायाम?1- आधी खाली नीट बसून घ्या.2- आता आपला उजवा गुडघा जमिनीवर वाकलेल्या स्थितीत ठेवा.3- डावा पाय सरळ मागच्या बाजूला जाऊ द्या.4- दोन्ही हात जमिनीवर अलगद टेकवा आणि जितकं मागे वाकता येईल तितकं वाका. त्यामुळे तुमच्या पाठीला बाक येईल.5- दोन सेकंद त्या स्थितीत थांबून आता पुढच्या बाजूला झुका आणि आपलं डोकं पुढे जमिनीवर टेकवण्याचा प्रय} करा. त्या स्थितीत पुन्हा पाच सेकंद थांबा.6- दोन्ही पायांची स्थिती बदलून म्हणजे अगोदर उजव्या आणि डाव्या पायाची जी स्थिती होती, तीच बदलून अनुक्रमे डाव्या आणि उजव्या पायांची करा.यामुळे काय होईल?1-  मांडय़ांच्या स्नायूला चांगला ताण मिळेल.2- पाठीचा व्यायाम होईल.3- लवचिकता वाढेल.4- आपल्या शरीराच्या अनेक अवयवांचं चांगल्या पद्धतीनं स्ट्रेचिंग होईल.5- या पद्धतीनं थोडं जास्त वेळ बसण्याचा सराव केल्यास बरीच दुखणी कमी होतील.

- तुमचीच गुटुरगुंùù’,ऊर्जा