शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तुमची ऑनलाईन मुलं आणि सात गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 17:36 IST

ऑनलाइन  मुलं -तज्ज्ञांना काय पर्याय सुचतात? भाग ६

ठळक मुद्देया सातपैकी काहीही तुमच्या मुलाच्याबाबतीत घडत असेल, तर तू धोक्याची सूचना आहे, हे लक्षात ठेवा!

  ऍड.  वैशाली भागवत,  प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ   

मुलं सायबर स्पेसमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. दरवेळी तांत्रिक असतात असं नाही. काहीवेळा त्या मनोसामाजिकही असू शकतात. कुणी त्यांना ट्रोल करू शकतं, बुली करु शकतं, विचित्र कमेंट्स मिळू शकतात, कुणी त्यांना ब्लॅकमेल करू शकतं. त्यांच्या संपर्कात कोण आहे हे अनेकदा पालकांना माहित नसतं.  मुलांना सायबर स्पेसमधल्या धोक्यांपासून वाचवायचं असेल तर सोबत दिलेल्या सात गोष्टींकडे पालकांनी गंभीरपणो बघायला हवं.या गोष्टी लक्षात आल्यानंतर पालकांच्या आणि शिक्षकांच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजलीच पाहिजे.  या सात ही गोष्टी लक्षात ठेवा. असं काही तुमचं मूल वागताना दिसलं तर आरडाओरडा ना करता मुलाला/मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोला. संवाद साधा. त्यांना ऑनलाईन वावरातले धोके समजावून द्या. संवादाइतकं प्रभावी माध्यम दुसरं कुठलंही नसतं हे लक्षात ठेवा. 

1) मूल सतत ऑनलाईन असेल तर ही गोष्ट नक्कीच धोकादायक आहे. सतत ऑनलाईन जाण्याविषयी हट्ट धरत असेल तर ही धोक्याची सूचना आहे. 2) निरनिराळ्या चॅट रूम्समध्ये मोठ्यांच्या देखरेखीशिवाय मूल जात असेल आणि अनोळखी लोकांशी संपर्क करत असेल तर ही धोक्याची सूचना आहे. 3) अनोळखी माणसांचे किंवा पोर्नोग्राफी फोटो, व्हिडीओ मूल डाउनलोड करत असेल तर पालकांनी अलर्ट व्हायलाच हवं. 4) अनोळखी माणसांचे फोन येत असतील, गिफ्ट्स येत असतील, मुलांच्या बँकेत अनोळखी खात्यातून पैसे जमा होत असतील तर हा रेड अलर्ट आहे. 5)  कुणाचा तरी पासवर्ड वापरून तुमचं मूल अकाउंट वापरत असेल तर मुलांशी बोलणं गरजेचं आहे कारण यातून मुलं धोक्यात येऊ शकतात. 6) वागण्यातल्या बदलांकडे लक्ष ठेवा. ऑनलाईन गेल्यावर काय काय करतात याबाबत मूल काहीच शेअरिंग करत नसेल तर काहीतरी गडबड आहे. 7) मोठी माणसं आसपास आल्यावर पटकन कम्प्युटर बंद करणं, फोन बंद करणं यासारख्या गोष्टी मुलं करत असतील तर पालकांनी अलर्ट व्हायला हवं आणि शांतपणो संवाद साधायला हवा.  (शब्दांकन: मुक्ता चैतन्य )