तुम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र आले की कशी धम्माल करता ना? गप्पा मारताना किती वेळ निघून जातो, हे कळतच नाही. मग तुम्ही शाळेत असा, क्लासला असा किंवा घरी. कुठेही असलो तरी आपलं मित्र-मैत्रिणींचं टोळकं जिथेतिथे खुसफुस करत असतंच. मला माहीत आहे, शाळेत टिचर शिकवत असतानाही ब:याचदा तुमच्या गप्पा सुरू असतात ते! टिचरची पाठ वळली रे वळली, त्यांचं लक्ष दुसरीकडे किंवा फळ्यावर काही लिहायला घेतलं की लगेच तेवढय़ा वेळात तुम्ही डोळ्यांच्या इशा:यांनी म्हणा, हावभाव करून म्हणा, किंवा कुजबुजत का होईना, तुम्ही लगेच गप्पा मारून घेताच!आणि थोडय़ा वेळासाठी का होईना, टाटाùù बाय बायùù करायची वेळ आली की तुम्हाला किती वाईट वाटतं ना?हो, मला माहीत आहे ते.पण आज तोच व्यायाम मी तुम्हाला शिकवणार आहे. टाटा, बाय बाय कसं करायचं ते!नाही, तुमच्या मित्र-मैत्रिणींना नाही टाटा करायचा. ते आता आपल्या जवळ आहेतच कुठे, टाटा करायला! पण आजच्या व्यायामात एक गंमत आहे. आपल्याला टाटा करायचाय, पण तो हातानं नाही, पायानं!
- तुमची ‘टाटा करो’ना मैत्रीण, ऊर्जा