मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला कात्री चालवता येते? म्हणजे कोणाला कात्रीकाम येतं. आपण शाळेत कातरकाम करतो. कधी आपल्याला कागद कापायचे असतात, कधी छोटं कापड कापायचं असतं. पण त्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची असतात, आपली मोटर स्किल्स. म्हणजे आपल्या हाताच्या बोटांची हालचाल अतिशय सफाईदारपणो होणं. हीच स्किल्स आपल्याला पुढे आयुष्यात अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडतात. मोटर स्किल्स चांगली असली, तर त्याचा तुम्हाला सफाईदारपणो लिहिण्यासाठी उपयोग होतो. सर्जन्सना, डॉक्टरांनाही या मोटर स्किल्सचा खूप मोठी उपयोग होतो. व्यायामासाठीही याच कात्रीचा फार उपयोग होतो. अनेक मोठमोठे अॅथलिट, व्यायामपटू या व्यायामाचा उपयोग करतात. आपल्याला करायची आहे आपल्या शरीराची, त्यातही आपल्य पायांची कात्री!या व्यायामाचं इंग्रजीतलं नावच मुळी आहे ‘सिझर किक’!
ही सीझर किक काय असते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:06 IST
करा, पायांची कात्री!
ही सीझर किक काय असते ?
ठळक मुद्देकशी करायची ही सिझर किक?